कपिल शर्मा शोमध्ये 'घरचा पायजमा' घालून पोहोचला Akshay Kumar, आणि...

सध्या कतरिना कैफ आणि अक्षय कुमार  'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

Updated: Nov 5, 2021, 05:21 PM IST
कपिल शर्मा शोमध्ये 'घरचा पायजमा' घालून पोहोचला Akshay Kumar, आणि... title=

मुंबई : सध्या कतरिना कैफ आणि अक्षय कुमार  'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोघेही अनेक रिअ‍ॅलिटी शो आणि इतर शोमध्ये एकत्र दिसत आहेत. आता कतरिना आणि अक्षय द कपिल शर्मा शोच्या पुढील भागात दिसणार आहेत. या शोमध्ये कतरिनाने पांढरा आणि निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. दुसरीकडे, ती अक्षय कुमारला त्याच्या आऊटफिटमुळे ट्रोल देखील करणार आहे.

कतरिनाकडून अक्षय ट्रोल 

कपिल शर्मा शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अक्षय कुमार शोमध्ये धमाका करताना दिसत आहे. अक्षय हुडी आणि पायजमा घालून शोमध्ये पोहोचला आहे. अशा परिस्थितीत तू घरचा पायजमा घालून आला आहेस असे म्हणत कतरिना कैफने त्याला ट्रोल केले आहे.

कतरिनाला उत्तर देताना अक्षय म्हणाला की, कपिलचा शो हेच त्याचे घर आहे. कतरिना आणि अक्षयचे मनोरंजन करण्यासाठी कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा कपिल शर्माच्या शोमध्ये असतील. कृष्णा जॅकी श्रॉफच्या अवतारात दिसणार आहे, तर किकू त्याच्या वकिलाच्या भूमिकेत कतरिनासोबत फ्लर्ट करणार आहे. या प्रोमोआधी, कतरिना आणि अक्षय कुमारच्या रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कपिल शर्माने त्यांचा फोटो बॉम्ब केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 

एका दशकानंतर अक्षय-कतरिना एकत्र 

'सूर्यवंशी' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर अक्षय कुमारने त्यात वीर सूर्यवंशीची भूमिका साकारली आहे. एका दशकानंतर तो कतरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसत आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगण आणि रणवीर सिंग यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे.

'सूर्यवंशी' हा चित्रपट 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.