''आता वेळ आलीये...'' Chandrayan 3 साठी खिलाडी कुमार काय म्हणाला पाहा

Akshay Kumar Chandrayan 3 : 'चंद्रायान 3' साठी आपण सर्वचजण फार उत्सुक आहोत. त्याचसोबत कलाकारही उत्सुक आहे. ही आपली मोहिम ऐतिहासिक ठरणार आहे. यावेळी खिलाडी अक्षय कुमारनं सध्या आपलं एक ट्विट शेअर केलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 14, 2023, 01:26 PM IST
''आता वेळ आलीये...'' Chandrayan 3 साठी खिलाडी कुमार काय म्हणाला पाहा  title=
July 14, 2023 | akshay kumar tweet on chandrayan 3 mission goes viral retweets old tweet on chandrayan 2 failure (Photo: Zee News)

Akshay Kumar Chandrayan 3 : सध्या उत्सुकता आहे ती म्हणजे 'चांद्रयान 3' मोहिमेची. यावेळी तमाम भारतीयांचे लक्ष या मोहिमेकडे लागून राहिली आहे. त्यामुळे आता काऊंनडाऊन सुरू झाले आहे अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे कधी एकदा ही मोहिम संपन्न होते आहे. यावेळी ट्विटवर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की कधी ही मोहिम यशस्वी होते आहे. ट्विटरवरून तसेच सोशल मीडियावरून अनेक जण हे 'चांद्रयान 3' मोहिमवरून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटीही यामध्ये भाग घेताना दिसत आहेत. यावेळी अक्षय कुमारची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं चांद्रयान मोहिमेसाठी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. अशावेळी त्यानं आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढत एक ट्विट शेअर केलंय. 

 सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड' या चित्रपटाची. सोबतच या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. हा विषय अत्यंत गंभीर असल्यामुळे यावर नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशावेळी या चांद्रयान मोहिमेसाठी अक्षय कुमारही फार उत्सुक आहे. यावेळी त्यानं एक ट्विट शेअर केले आहे. चार वर्षांपुर्वी जेव्हा 'चांद्रयान 2' या मोहिमेला अपयश आले होते तेव्हा या सर्व वैज्ञानिकांना चिअर-अप करण्यासाठी त्यानं इंटरेस्टिंग ट्विट केले होते. सोबतच त्याच्या या ट्विटरवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोबतच अशावेळी त्यानं तेच ट्विट शेअर करत चांद्रयान 3 मोहिमेसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा - Oh My God 2 ची स्टोरी सोशल मीडियावर लीक;  'या' गंभीर विषयावर चित्रपटाची कथा

'भारतीय अंतराळ संशोधन संस्था' म्हणजे इस्त्रोकडून आज दुपारी 2.30 च्या सुमारास 'चांद्रयान 3' हे यान चंद्राकडे जायला रवाना होईल. सध्या अख्ख्या भारताचे याकडे लक्ष लागले आहे. काही तासातच ही मोहिम लॉन्च होईल. त्यामुळे सगळ्यांच्याच मनात घस्सं सुरू झालं. त्यामुळे सध्या सर्वच नागरिक या मोहिमकडे डोळे लावले आहेत. 

नक्की काय म्हणाला अक्षय कुमार? 

"आता वेळ उगवण्याची आली आहे. आमच्या सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप अभिनंदन. चांद्रयान 3 साठी लाखो चाहते तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत'', असं त्यानं या ट्विटमध्ये लिहिलं आहे. अशाच आता त्याचे जुने ट्विटही व्हायरल होते आहे. ''प्रयोगाशिवाय विज्ञान नाही. कधी आपण यशस्वी होतो, तर कधी शिकतो." इस्रोच्या तल्लख शास्त्रज्ञांना मी सलाम करतो. आम्हाला अभिमान आहे आणि विश्वास आहे की 'चांद्रयान 2' सारखाच 'चांद्रयान 3'चा मार्ग लवकरच करेल. आम्ही पुन्हा उठू." असे ट्विट त्यानं 2019 मध्ये केले होते.