अक्षय कुमार-टायगर श्रॉफ की अजय देवगण? बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

Akshay Kumar-Tiger Shroff or Ajya Devgn Who did Great work at Box Office : अक्षय कुमार, टायगर श्रॉफ की अजय देवगण पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी...

दिक्षा पाटील | Updated: Apr 12, 2024, 12:42 PM IST
अक्षय कुमार-टायगर श्रॉफ की अजय देवगण? बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी? title=
(Photo Credit : Social Media)

Akshay Kumar-Tiger Shroff or Ajya Devgn Who did Great work at Box Office : यंदाच्या वर्षी ईदच्या निमित्तानं सलमान खानचा नाही तर अजय देवगणचा मैदान आणि अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट भारतीय फूटबॉलचा गोल्डन बॉय अशी ओळख असणाऱ्या सैयद अब्‍दुल रहीम यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्याची सगळीकडे स्तुती सुरु आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटाला जास्त रिव्ह्यू मिळाले नसले तरी त्यानं ओपनिंग डेला चांगली कमाई केली आहे. 

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटानं पहिल्या दिवशी खूप कमी कमाई केली. त्यामुळे आता निर्मात्यांना आशा आहे की येत्या पहिल्या विकेंडला चांगली कमाई करु शकतात. त्यामुळे हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत की हा चित्रपट किती कमाई करणार आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं 2.6 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 4.5 कोटींची कमाई केली. तर या चित्रपटानं दोन दिवसात 7.15 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे अक्षय कुमार आणि टायगरच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यानं पहिल्याच दिवशी 14.6 कोटींची कमाई केली आहे. दोन्ही चित्रपटांच्या कमाईची तुलना करता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे पहिल्याच दिवशी अक्षय आणि टायगरच्या चित्रपटानं सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर या चित्रपटानं पहिल्याच दिवशी वर्ल्ड वाईड 36.33 कोटींची कमाई केली आहे. 

हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी

'बडे म‍िया छोटे मिया' या चित्रपटाला भारतात 2500 जवळपास स्क्रिन्स मिळाल्या तर 'मैदान' या चित्रपटाला 2000 स्क्रिन्स मिळाले. अक्षय आणि टायगरचा चित्रपट हा हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाचं एकूण बजेट हे 350 कोटींच आहे. अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्याचं बजेट हे 100 कोटी रुपये आहे. गेल्या बऱ्याच काळापासून अक्षय आणि टायगर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. तर अक्षय आणि टायगर यांनी सोशल मीडियावर अनेक रील व्हिडीओ शेअर केले होते.