Akshay Kumar Tested Corona Positive: अक्षय कुमारला कोरोना, ट्वीट करून म्हणाला...

नुकताच अक्षय कुमारनं 30 मार्च रोजी राम सेतु सिनेमाचा फर्स्ट लूक त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

Updated: Apr 4, 2021, 11:16 AM IST
Akshay Kumar Tested Corona Positive: अक्षय कुमारला कोरोना, ट्वीट करून म्हणाला... title=

मुंबई: IPLचे वारे सुरू असतानाच कोरोना झपाट्य़ानं वाढत आहे. क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये वेगानं कोरोना पसरत आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. 

अभिनेता अक्षय कुमारनं आज सकाळी कोरोनाची चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं अक्षय़नं सांगितलं आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन अक्षय़ कुमारनं यावेळी चाहते आणि सर्वांना केलं आहे. दरम्यान अक्षय़ कुमार कोरोनातून लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.  

अक्षय कुमारनं ट्वीट करून कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. सध्या त्याने स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे. अक्षय कुमारच्या ट्वीटनंतर चाहत्यांनी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना केली आहे. तर आपल्या संपर्कात आलेल्यानी तातडीनं कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन अक्षय कुमारनं केलं आहे.

नुकताच अक्षय कुमारनं 30 मार्च रोजी राम सेतु सिनेमाचा फर्स्ट लूक त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या शूटिंगमध्ये अक्षय कुमार व्यस्त होता. आता सध्या अक्षय कुमारनं स्वत:ला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 

Tags: