Kesari Poster : 'हे' आहेत सारागढीचे शिलेदार

सारागढीच्या शिपायांनी रचला इतिहास

Updated: Jan 27, 2019, 09:33 AM IST
Kesari Poster : 'हे' आहेत सारागढीचे शिलेदार title=

मुंबई : संपूर्ण देशभरासह बॉलिवूडकरांनीही प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रजासत्ताकदिनाचं औचित्य साधून मुहूर्तावर अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'केसरी' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात अक्षय एका सरदार शिपायाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पोस्टरमध्ये अक्षय कुमार आपल्या सर्व शिपायांसह एका अॅक्शन पोझिशनमध्ये दिसत आहे. १८५७ साली सारागढी येथे अफगाणांसह झालेल्या शीख रेजिमेंटच्या लढाईवर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमात अक्षय इंडो-ब्रिटिश आर्मीचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे.

ट्विटरवर पोस्टर शेअर करत अक्षयने प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपले जवान आपल्यासाठी अनेक वर्षांपासून लढत आहेत. १२२ वर्षांपूर्वी २१ शिखांनी १० हजार अफगाणी हल्लेखोरांशी लढाई केली होती. २१ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या केसरीतून त्यांचीच गोष्ट सांगण्यात आली असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. पोस्टरमध्ये २१ शिख सैनिक पिरॅमिडच्या आकारात बसले असून अक्षय केशरी रंगाची पगडी घालून मधोमध त्यांचे नेतृत्व करताना दिसत आहे.

 

अक्षय कुमारसह चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ती अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये चित्रीकरण सुरू असताना सोशल मीडियावर अक्षय आणि परिणीतीचा एक फोटो शेअर झाला होता. अनुराग सिंह दिग्दर्शित 'केसरी' येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.