चुकीची 'गुड न्यूज' घेऊन आले अक्षय- करिना

पंजाबी सुपरस्टारशी आहे असं कनेक्शन 

Updated: Nov 18, 2019, 01:54 PM IST
चुकीची 'गुड न्यूज' घेऊन आले अक्षय- करिना title=
चुकीची 'गुड न्यूज' घेऊन आले अक्षय- करिना

मुंबई : सहसा गुड न्यूज ही अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आयुष्यातही सकारात्मकतेची उधळण करते. पण, खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार, करिना कपूर खान, दिलजीत दोसांज आणि किआरा अडवाणी यांच्या जीवनात मात्र एक भलतीच गुड न्यूज आली आहे. ही अशी 'गुड न्यूज' आहे, ज्यामुळे दोन जोडप्यांच्या जीवनावर त्याचे थेट परिणाम झाले आहेत. 

हे सारं खऱ्या आयुष्यात नव्हे, तर 'गुड न्यूज' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने सुरु आहे. एकसारखंच आडनाव असणाऱ्या दोन जोडप्यांच्या जीवनात नव्या पाहुण्याच्या येण्याच्या निमित्ताने आयवीएफ सेंटरच्या चुकीमुळे जो घोळ घातला जातो, त्याची झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. 

पंजाबी कलाविश्वात सुपरस्टार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अभिनेता दिलजीत दोसांज आणि त्याच्यासोबत झळकणाऱ्या अभिनेत्री किआरा अडवाणी हिचा विनोदी अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तर, एका उच्चभ्रू जोडप्याच्या भूमिकेत झळकणाऱ्या करिना आणि अक्षय या दोघांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. 

विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये टिस्का चोप्रा, अंजना सुखानी आणि युक्ता मुखीसुद्धा झळकणार आहेत. आतापर्यंत अक्षय आणि करिनाने अजनबी, ऐतराज, कम्बख्त इश्क, टशन, गब्बर इज बॅक अशा चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. पण, एकमेकांव्यतिरिक्त आता आणखी दोन आघाडीच्या कलाकारांसमवेत म्हणजेच दिलजीत दोसांज आणि किआरा अडवाणीसोबत त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.