मुंबई : इंधन दरवाढीवरून आगडोंब उसळला असताना, कायम टिव टिव करणाऱ्या सेलिब्रिटींनाही आता त्याची धग सोसावी लागत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यानंतर सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता मोदी सरकारच्या काळात पेट्रोलच्या किंमती ८५ रूपयांवर जाऊन पोहोचल्या असताना, हे सेलिब्रिटी कुठं तोंड लपवून बसलेत? असा हल्ला नेटिझन्सनी विचारला आहे.
पेट्रोलची किंमत ७५ रूपयांवर गेल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक जोक ट्विट केला होता. पंप चालक विचारतो, कितीचं पेट्रोल टाकू? त्यावर मुंबईकराचं उत्तर - दोन-चार रूपयाचं पेट्रोल कारवर शिंपड बाबा... जाळून टाकतो कार... शिवाय पेट्रोलचा वास किती छान आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता. आता बच्चनना पेट्रोलचा वास येत नाही का? अशी विचारणा त्यांना ट्रोल करणारे करत आहेत.
It is painful to see that your favourite actor @akshaykumar has been turned into a political stooge. Always love him for his dedication, fearless voice and charisma but he is under political pressure.wish he were like @mrsfunnybones ,@ReallySwara ,@udaychopra & Prakash Sir.Alas
— Eve (@AdorableRadhika) May 22, 2018
@akshaykumar Ek baat bolun? Dil se bolun? Direct bolta hoon. Pura direct - Tum saala darpok nikle.
— Jagrat Yogaj Biswal (@JYBiswal) May 22, 2018
तर आता सायकली बाहेर काढायची वेळ आलीय, असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं होतं. त्यावर ट्रोलिंग सुरू झाल्यानंतर अक्षयनं ते जुनं ट्वीटचं डिलीट करून टाकलं.