Ajaz Khan : ड्रग्स प्रकरणात अभिनेता एजाज खान 26 महिने तुरुंगात होता. 2021 साली एजाजला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता इतक्या महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टानं जामीनावर सुटका केली आहे. तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिथे त्याचा अनुभव कसा होता याविषयी एजाजनं सांगितलं आहे. त्यानं सांगितलं की त्याला तणाव आणि नैराश्यात गेलो होतो. तुरुंगातील कैद्यांची परिस्थिती म्हणजे संपूर्म जगात कुठे सगळ्यात जास्त लोक आणि गर्दीचं ठिकाणी असेल तर ते तुरुंग आहे. तिथे एक टॉयलेट हे 400 कैदी वापरतात. त्याशिवाय त्यानं शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला भेटल्याचे देखील सांगितले.
'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना एजाज म्हणाला, “तुरुंगातील एक दिवस एका वर्षासारखा वाटतो. ज्या व्यक्तीनं माझ्यावर केस केली त्याच्याविषयी मला काहीही बोलायचे नाही. त्याच्याबरोबर काय घडतय हे संपूर्ण जग पाहतय. मी त्याला फक्त शुभेच्छा देतो. निकाल लागण्यापूर्वीच मला दोषी घोषित करण्यात आले होते. शेवटी मला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. मी 26 महिने तुरुंगात होतो. माझं काम आणि माझ्या मुलाला मोठं होताना पाहू शकलो नाही. "
एजाज पुढे आर्थर रोड कारागृहातील गर्दीविषयी बोलताना सांगितले, 800 लोकांची क्षमता तुलनेत 3500 कैदी या कारागृहात राहतात. याविषयी बोलताना एजाज म्हणाला, “कारागृहात एका टॉयलेटमध्ये 400 लोक जातात. त्यामुळे तिथल्या स्वच्छतागृहातील परिस्थितीची कल्पना करा. या संपूर्ण प्रसंगामुळे मी तणाव आणि नैराश्यातून गेलो. माझ्यासाठी जगणे खूप कठीण होते, पण मला माझ्या कुटुंबासाठी जगावे लागले. ज्यात माझे 85 वर्षांचे वडील, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.”
एजाज खान हा 'बिग बॉस 7' मध्ये दिसला होता. 2003 मध्ये एजाजनं त्याच्या करिअरची सुरुवात केली. 'पथ' या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 2007 साली तो एकता कपूरच्या 'क्या होगा निम्मो का' या मालिकेत दिसला होता. त्यानं 'कहानी हमारे महाभारत की', 'करम अपना अपना' आणि 'रहे तेरा आशीर्वाद' यात देखील दिसला होता. तर एजाज खान हा 'बॉलीवुड क्लब' या रिअॅलिटी शोचा विजेता ठरला होता