Ajay Devgn Share Old Bill On Social Media: अजय देवगन 'दृश्यम 2' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र तत्पूर्वी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. अजय देवगननं इन्स्टाग्रामवर जुनी बिलं शेअर केली आहेत. ही सर्व बिलं 2014 ची आहेत. बिलं 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'दृश्यम' (Drishyam) चित्रपटातील दाखवण्यात आली होती. ही सर्व बिलं 2 आणि 3 ऑक्टोबर 2014 ची आहेत. या चित्रपटात चौकशीदरम्यान पोलीस त्यांना वारंवार याबाबत प्रश्न विचारतात. ‘2 अक्टूबर को क्या हुआ था?’ त्यानंतर अजयचं कुटुंब ही बिलं दाखवत प्रश्नांची उत्तरं देते. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बिले शेअर करताना अजय देवगनने (Ajay Devgn) लिहिले, "काही जुनी बिले आज हाती लागली आहेत!" अजय देवगनच्या या पोस्टनंतर 'दृश्यम 2' चा फर्स्ट लुक आणि टीझर लवकरच येईल असा नेटकऱ्यांना विश्वास आहे. 'दृश्यम 2' चा फर्स्ट लुक किंवा टीझर 2 ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो, असंही काही जणांचं म्हणणं आहे. दुसरीकडे एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, "तब्बू मॅडम पुन्ही ही केस ओपन करण्याची तयारी करत आहे. गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे. बिलं सांभाळून ठेवा."
Kuch purane bills haath lage aaj! pic.twitter.com/fxSF3g0zv7
— Ajay Devgn (@ajaydevgn) September 27, 2022
'दृश्यम' चित्रपटात अजय देवगन पुरावा म्हणून दाखवतो. या बिलांमध्ये 'अशोका रेस्टॉरंट'च्या बिलाचा समावेश असून 3 अतिरिक्त पावांसह 4 पावभाजीची ऑर्डर, 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी स्वामी चिन्मयानंदजींच्या महा सत्संगाची सीडी, पंजीम ते पोंडोलेमचे तिकीट आणि चित्रपटाच्या 4 तिकिटांचा समावेश होता. चित्रपटात निर्दोषत्व सिद्ध करण्यात या बिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.