मुंबई : सेलिब्रिटी आणि स्टार किड्स म्हटलं की त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे चाहत्यांचं लक्ष असतं. अभिनेता अजय देवगण कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. फक्त तोचं नाही तर, त्याची मुलगी न्यासा देखील कायम चर्चेत असते. पण आता अजय थोड्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.
अजयने नुकताचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. त्याची 'रुद्र' सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात दमदार भूमिका साकारणाऱ्या अजयच्या आयुष्यातील एक मोठी गोष्ट सर्वांच्या समोर आली आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण अनेक गोष्टी त्याच्या मुलांकडून शिकतो. एवढंच नाही तर तो मुलांकडून शिकलेल्या गोष्टींचा रोजच्या आयुष्याच्या उपयोग देखील करतो.
अजय म्हणतो, 'आपल्या पुढच्या पिढीच्या संपर्कात राहिल्यास अनेक गोष्टी शिकता येतात. मी कायम डिजिटल विश्वाबद्दल मुलांना विचारत असतो. फक्त माझी मुलं नाही तर, इतर मुलांना देखील विचारतो, सध्या काय नवीन सुरू आहे...?'
नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्या आत्मसात करण्यासाठी कायम मुलांच्या संपर्कात राहायला पाहिजे.... असं अजय म्हणाला. अजयची मुलगी न्यासा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
अजय देवगणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याचे एकापाठोपाठ एक अनेक सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहेत. 'आरआरआर', 'थँक गॉड', 'रनवे 34', 'मैदान' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.