अजय देवगणचा 'रेड' झाला लीक ! 'या' वेबसाईट्सवर होतोय डाऊनलोड ...

शुक्रवारी बॉक्सऑफिसवर अजय देवगणचा 'रेड' चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. मात्र आता फिल्ममेकर्ससाठी एक वाईट बातमी आहे. 'रेड' हा चित्रपट पायरसीच्या विळख्यात अडकला आहे. 

Updated: Mar 19, 2018, 05:23 PM IST
अजय देवगणचा 'रेड' झाला लीक ! 'या' वेबसाईट्सवर होतोय डाऊनलोड ...  title=

मुंबई : शुक्रवारी बॉक्सऑफिसवर अजय देवगणचा 'रेड' चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. मात्र आता फिल्ममेकर्ससाठी एक वाईट बातमी आहे. 'रेड' हा चित्रपट पायरसीच्या विळख्यात अडकला आहे. 

वेबसाईटवर चित्रपट झाला लीक  

रेड हा चित्रपट वेबसाईटवर लीक झाला आहे. भारतामध्ये पायसीबाबत कडक कायदे करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधितांना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. असे असूनही 'रेड' चित्रपट हा सर्रास ऑनलाईनवर लीक झाला आहे. 

डाऊनलोड करणं चूकीचं 

पायरसीच्या नियमांनुसार, पायरेटेड कंटेंड पाहणं किंवा डाऊनलोड करणं हा गुन्हा आहे. त्याकरिता आरोपींना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. 

कोणकोणत्या वेबसाईटवर लीक झाला चित्रपट ? 

'रेड' हा चित्रपट rdxhd, moviespur, bigdaddymovies, aeonsource यासारख्या अनेक साईटवर लीक झाला आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या ऑनलाईन कलेक्शनवर होणार आहे. 

कोटींची कमाई 

पहिल्या वीकेंडला या सिनेमाने जबरदस्त कमाई केलीये. सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत ४१.२५ कमाई केलीये. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बालाच्या ट्विटनुसार, पद्मावतनंतर ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा रेड दुसरा सिनेमा ठरलाय. 

अजयचा दमदार अभिनय

अजय देवगणच्या या सिनेमाचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही कौतुक केलेय. या सिनेमा इलियाना अजयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. अजय देवगण यात लखनऊचा इनकम टॅक्स अधिकारी शरद प्रसाद पांडेच्या भूमिकेत आहे.शरदने एक व्यापारी सरकार इंद्र सिंहच्या घरावर १९८१मध्ये छापा टाकला होता. यात १ कोटी ६० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. ही रेड १८ तास सुरु होती. यात ४५ लोक केवळ नोटा मोजण्यासाठी बसले होते.