ऐश्वर्याने फोटो शेअर करत अमिताभ आणि जया बच्चन यांना दिल्या शुभेच्छा

ऐश्वर्याने सासू-सासऱ्यांना दिल्या शुभेच्छा

Updated: Jun 4, 2018, 01:58 PM IST
ऐश्वर्याने फोटो शेअर करत अमिताभ आणि जया बच्चन यांना दिल्या शुभेच्छा title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन इंस्टाग्रामवर खूपच फॉलो केली जाते. काही दिवसातच तिचे 3.3 मिलियन फॉलोवर्स झाले होते. ऐश्वर्याने तिच्या अकाउंटवर फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर ऐश्वर्याने सासू जया बच्चन, सासरे अमिताभ बच्चन, मुलगी आराध्या आणि ननंदचा मुलगा अगस्तय नंदा यांच्या फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ऐश्वर्याने अमिताभ आणि जया यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. पण या फोटोमध्ये दोघांमध्ये सर्वकाही व्यवस्थित असल्या सारखं दिसत आहे.

 

Happyyy Anniversary Pa n Ma Love, Health and Happiness always God Bless

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on