Aishwarya At Cannes: ऐश्वर्याची एन्ट्री आणि सर्व सौंदर्यवती पडल्या फिक्या

ऐश्वर्याचा रेड कार्पेटवरील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

Updated: May 19, 2022, 08:51 AM IST
Aishwarya At Cannes: ऐश्वर्याची एन्ट्री आणि सर्व सौंदर्यवती पडल्या फिक्या title=

मुंबईः पुन्हा एकदा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' सुरू झाला आहे. या फेस्टच्या रेड कार्पेटवर भारतीय सौंदर्यवती आपला जलवा दाखवतात. मात्र ऐश्वर्या रायने प्रवेश करताच सर्वजण तिच्यापुढे फिक्या पडल्या आहेत. ऐश्वर्याचा रेड कार्पेटवरील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऐश्वर्या रायने रेड कार्पेटवर हजेरी लावण्यासाठी काळ्या रंगाचा गाऊन निवडला.  या गाऊनला दिलेला फ्लोरल टच अप्रतिम आहे. ऐश्वर्या राय बच्चनच्या ब्लॅक रफल फ्लॉवर गाऊनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ऐश्वर्या रायच्या लूकबद्दल सांगायचे तर, तिच्या गाऊनमध्ये तिच्या उजव्या हातावर अनेक रंगीबेरंगी फुले दिसत होती. त्याच वेळी, गाऊनच्या डाव्या बाजूला खालीपर्यंत फुले दिसत होती. ऐश्वर्याने न्यूड मेकअप केला होता आणि ती तिच्या या लूकमध्ये अप्रतिम दिसत होती.

ऐश्वर्या राय रेड कार्पेटवर अवतरताच तिने पुन्हा एकदा सिद्ध केले की ती जगातील सर्वात सुंदर महिला आहे. ऐश्वर्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्या राय जवळजवळ दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते आणि प्रत्येक वेळी ती तिच्या सौंदर्याची जादू या फेस्टिव्हलमध्ये दाखवते. मात्र यावेळी तिने रेड कार्पेटवर हजेरी लावताच सोशल मीडियावर तिचा ट्रेंड सुरू झाला.