अंबानींच्या पार्टीमध्ये लाखोंचा ड्रेस घालून पोहोचली ऐश्वर्या

नेहमी बॉलिवूड इवेंट्सपासून आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये रेड कारपेटवर आपल्या लूकने हैराण करणारी ऐश्वर्या राय-बच्चन मुकेश अंबानी यांच्या पार्टीमध्ये पोहोचली होती. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 9, 2017, 08:04 PM IST
अंबानींच्या पार्टीमध्ये लाखोंचा ड्रेस घालून पोहोचली ऐश्वर्या title=

मुंबई : नेहमी बॉलिवूड इवेंट्सपासून आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये रेड कारपेटवर आपल्या लूकने हैराण करणारी ऐश्वर्या राय-बच्चन मुकेश अंबानी यांच्या पार्टीमध्ये पोहोचली होती. 

ऐश्वर्याचा नवा लूक

अंबानींच्या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स येत राहतात. पण अंबानींच्या या पार्टीमध्ये ऐश्वर्याचा लूक आणि ड्रेस चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. अंबानी यांच्याकडून ऐश्वर्या आणि अभि‍षेक यांना एका कॅज्यूअल डिनरसाठी आमंत्रित केलं गेलं होतं. पण सर्वांना आश्चर्य तेव्हा झाला जेव्हा ऐश्वर्याने यासाठी लाखोंचा ड्रेस घातला. 

लाखोंचा घातला ड्रेस

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार या पार्टीमधील ऐश्वर्याचे फोटो स्टाइलिस्ट आस्था शर्माने पोस्ट केले. ज्यामध्ये ऐश्वर्याने पिवळ्या रंगाचा टक्सि‍डो गाउन घातला आहे. याची किंमत जवळपास 3 लाख 70 हजार असल्याचं बोललं जात आहे.