Video: 'ती फार माज दाखवते!' एअर होस्टेसकडून अभिनेत्रीची पोलखोल; खरा चेहरा आणला समोर

Air Hostess Shocking Revelation About Famous Actress: या एअर होस्टेसची मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या अभिनेत्रीवर टीकेची झोड उठवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2024, 02:46 PM IST
Video: 'ती फार माज दाखवते!' एअर होस्टेसकडून अभिनेत्रीची पोलखोल; खरा चेहरा आणला समोर title=
सध्या ही मुलाखत चांगलीच चर्चेत आहे

Air Hostess Shocking Revelation About Famous Actress: अभिनेत्री कियारा अडवाणी ही सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मागील अनेक चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्यात लक्षात राहिला आहेत. सत्यप्रेम की कथा (2023) किंवा भूल भुलैय्या-2 (2022) असो कियाराने साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. मात्र सिनेमात भूमिका साकारणारी कियारा आणि प्रत्यक्षातील कियारा अगदी वेगळ्या असल्याचा दावा सध्या एका मुलाखतीच्या आधारे केला जात आहे. सध्या व्हायरल झालेल्या एका मुलाखतीमध्ये एअर होस्टेसने कियारा खऱ्या आयुष्यात कशी आहे यासंदर्भातील खुलासा केला आहे.

काय म्हणाली आहे ही तरुणी?

सदर मुलाखतीमध्ये या एअर होस्टेसने कियारा फार अॅटीट्यूड म्हणजेच माज दाखवते, असा दावा केला आहे. विमानामध्ये जेव्हा कियाराला एअर होस्टेसने नियमाप्रमाणे पाहुणचाराचा भाग म्हणून बदाम आणि काजू देऊ केले असताना तिने फारशी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कियाराबद्दल दावा करणाऱ्या या एअर होस्टेसने आपला थेट कियाराशी संवाद झाला नाही, असं मान्य केलं असलं तरी तिच्या सहकाऱ्याबरोबर हा प्रकार घडल्याचं आवर्जून नमूद केलं आहे.

व्हिडीओ व्हायरल

जिच्याबरोबर हा प्रकार घडला तिनेच आपल्याला हे सांगितल्याचं एअर होस्टेसचं म्हणणं आहे. कियाराने केवळ काजू-बदाम देऊ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिच्या असिस्टंटला बोलावयला सांगितलं. या असिस्टंटकडूनच आपण काय ते घेऊ असं कियाराने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवत आपली मतं मांडली आहेत.

नक्की वाचा >> 'हिने काय खाल्लंय?' विचारणाऱ्या महिलेला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तू स्तनपान करणाऱ्या..'

ती अती करते, चाहत्यांचीही टीका

'कियारा फारच ओव्हराहाइप्ट (अती महत्त्व दिली जाणारी) अभिनेत्री आहे,' अशी प्रतिक्रिया एकाने नोंदवली आहे. "मला तिचा अभिनय कधीच आवडला नाही. अभिनेत्री म्हणूनही ती आवडली नाही. सिद्धार्थला अजून चांगला जोडीदार मिळाला असता," असं अन्य एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने, "कियारा मला कधीच आवडली नाही. ती फार आत्मप्रौढी आहे. खास करुन लग्नानंतर ती तिच्या लूकमुळे चर्चेत असून अभिनेत्री म्हणूनही ती काही नवीन करु इच्छित नाही. सतत एकाच पठडीतील भूमिका ती साकारते," अशी टीका केली आहे.

अनन्याबद्दलचा मजेदार किस्साही सांगितला

एअर होस्टेसने एका अभिनेत्री अनन्या पांडेने विमान अगदी लॅण्डींगच्या तयारीत असतानाच वॉशरुमला जाण्यासंदर्भातील विचारणा केल्याची आठवण सांगितली. 'मला धीर धरता येणार नाही. मला वॉशरुमला जायचं आहे,' अनन्याने सांगितल्याचं ही एअर होस्टेस म्हणाली. अनन्याला वॉशरुमला जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र लवकरात लवकर बाहेर ये, असंही तिला सांगितलं होतं, असं एअर होस्टेसने सांगितलं. मात्र आता या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे तर या अभिनेत्रीच सांगू शकतील.