'वाळवी' नंतर आता परेश मोकाशी आणि मधुगंधाच्या 'या' चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष

Paresh Mokashi and Madhugandha Kulkarni Upcoming Movie : परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णीच्या आगामी चित्रपटात प्रशांत दामले साकारणार महत्त्वाची भूमिका, तर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

दिक्षा पाटील | Updated: Nov 6, 2024, 07:16 PM IST
'वाळवी' नंतर आता परेश मोकाशी आणि मधुगंधाच्या 'या' चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष title=
(Photo Credit : PR Handover)

Paresh Mokashi and Madhugandha Kulkarni Upcoming Movie : 'हरीश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'वाळवी' या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅटट्रिकनंतर लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांच्या या नाटकाचं नाव ‘मु.पो. बोंबिलवाडी’ आहे. तर त्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार यापासून सगळ्यांचीच चर्चा रंगली होती. आता ते सगळं समोर आलं असून चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

‘मु.पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटात हिटलरच्या भूमिकेतप्रशांत दामले दिसणार आहेत. हे स्पष्ट झाल्यानंतर आता चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे दिसणार असल्याचे जाहीर झाले आहे. निर्मात्यांनी आज ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चं पोस्टर प्रदर्शित केलं. 1 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होवू घातलेल्या या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट मल्टी-स्टारर आहे. प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर,  मनमित पेम,  रितिका श्रोत्री,  प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांच्या गतवर्षी चित्रपटगृहांमध्ये धमाल उडवून देणाऱ्या ‘वाळवी’ला अलीकडे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘नाच गं घुमा’ने यंदा प्रचंड प्रतिसाद मिळवला. 'हरीश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'ची. व ची. सौ. का.', 'आत्मपॅम्प्लेट' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद द्विगुणीत करत परेश आणि मधुगंधा यांनी त्यांच्या ‘मु.पो.बोंबिलवाडी- 1942 एका बॉम्बची बोंब’ची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केली.

चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रदर्शित केलेल्या मोशन पोस्टरवरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटीशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते, याचा अंदाज रसिकांना आला होता. आज प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरच्या माध्यमातून नवनवीन पात्रे रसिकांसामोरे येतात. ती साकारत असलेले कलाकार या पोस्टरमध्ये दिसतात आणि एवढी मोठी स्टारकास्ट असल्याने चित्रपट अत्यंत दर्जेदार असेल, याही खुणगाठ प्रेक्षक आपोआप बांधतो.

हेही वाचा : अभिषेकसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर 'हे' काय बोलली निम्रत कौर

या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजेलेल्या याच नावाच्या नाटकाचे हे चित्रपटीय स्वरूप आहे. रसिकांच्या मागणीवरून ही चित्रपट निर्मिती संहितेत काही बदल करून केली गेली आहे.