बॉलीवूड स्टार्सना सहन होत नाहीये लॉकडाऊन, टायगर - दिशानंतर आलिया - रणबीरही निघाले फिरायला

कोरोनातून बरी झालेली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील फ्लाइट पकडून मालदीवला निघाले आहेत.

Updated: Apr 19, 2021, 03:35 PM IST
बॉलीवूड स्टार्सना सहन होत नाहीये लॉकडाऊन, टायगर - दिशानंतर आलिया - रणबीरही निघाले फिरायला title=

मुंबई : सगळीकडे मुंबईत लॉकडाउनचं चित्र पहायला मिळत आहे, चित्रपटांच्या शूटिंगवर पूर्णपणे बंदी आहे. अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकार घरात न थांबता सुट्टीवर निघून जात आहेत. त्यांना पाहून असं दिसत आहे की, त्यांच्या या अशा वागणूकीवरुन दिसंत आहे की, कलाकारांना बंदी सहन होत नाहीये. यापूर्वी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी  वेकेशनसाठी घराबाहेर पडले होते, आता काही दिवसांपूर्वी कोरोनातून बरी झालेली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील फ्लाइट पकडून मालदीवला निघाले आहेत.

आलिया-रणबीर मालदीवला रवाना झाले
या स्टार्सना पाहून असं वाटतय की, त्यांना कोरोना संसर्गाची काहीच भिती उरली नाही आहे. नुकतेच आलिया आणि रणबीर कपूर विमानतळावर स्पॉट झाले. दोघांनीही एकसारखे कपडे परिधान केले होते. रणबीरने व्हाइट टी-शर्ट आणि ब्लू डेनिम परिधान केलं होतं, तर आलिया भट्ट ऑल व्हाईट अवतारमध्ये दिसली होती. दोघांनीही ब्लॅक मास्क आणि ब्लॅक गॉगल घातले होते.

हे स्टारपण पोहचले मालदीवला
त्याच दिवशी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनाही वेगवेगळ्या विमानतळांवर स्पॉट केलं होते, त्यानंतर त्यांचे चाहतेही दोघेही मालदीवला रवाना झाल्याचा निशाणा लावत आहेत. तसंच, मालदीव बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी 'न्यू गोवा' बनलं आहे. एक दिवसांत स्टार मालदीवमध्ये दाखल होत असतात. यापूर्वी दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, सारा अली खान आणि अमृता सिंग मालदीवमध्ये पोहोचल्या होत्या.

लॉकडाऊनमुळे काम थांबलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक द चेन' जाहीर केली. 1 मे रोजी रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत हा आदेश लागू झाला. या घोषणेत ते म्हणाले की, या काळात केवळ अत्यावश्यक सेवा कार्यरत राहतील. अत्यावश्यक सेवांची यादी जी जाहिर केली त्यात चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीचा कोठेही उल्लेख नव्हता. यामुळेच चित्रपटातील कलाकार नाराज आहेत आणि काहीजण सुट्टीवर जाताना पहायला मिळत आहे.