'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

या चित्रपटासाठी विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे.

Updated: Apr 12, 2019, 01:50 PM IST
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय स्टारर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या स्थगितीनंतर आता चित्रपट निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या याचिकेवर सोमवार १५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक होईपर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याचं सांगण्यात आलं होतं. याप्रकरणी सेन्सॉर बोर्ड आणि सूचना प्रसारण मंत्रालयालाही निर्देश देण्यात आले आहेत. 

कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्याच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपट निवडणूकीदरम्यान प्रदर्शित करण्यात येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डकडून आधी प्रदर्शनासाठी मंजूरी देण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे. विवेक ओबेरॉय चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

या चित्रपटासाठी विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यानच प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाला चांगला फायदा होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस कार्यकर्त्याने केलेल्या चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका फेटाळली होती. न्यायालयाने याप्रकरणी योग्य निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोग 'योग्य' असल्याचं म्हटलं होतं.