Dilip Kumar यांच्या निधनानंतर कशी आहे Saira Banu यांची प्रकृती? धर्मेंद्र यांना सतावते चिंता

दिलीप कुमार यांच्या सायरा बानो अद्यापही...., जवळच्या व्यक्तींना सतावते त्यांची चिंता..  

Updated: Apr 8, 2022, 08:24 AM IST
Dilip Kumar यांच्या निधनानंतर कशी आहे Saira Banu यांची प्रकृती? धर्मेंद्र यांना सतावते चिंता title=

मुंबई : खरं प्रेम म्हणजे काय असतं? या प्रश्नाचा उत्तम उत्तर म्हणजे दिग्गज कलाकार दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची पत्नी सायरा बाने (Saira Banu)... दिलीप कुमार आज आपल्यात नाहीत.... त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला...  चाहत्यांची अशी अवस्था होती, तर सायरा बानो यांची परिस्थिती कशी असेल. याचा अंदाज देखील आपन लावू शकत नाही. 

गेल्या वर्षी दिलीप कुमार यांचं निधन झालं, पण सायरा बानो आजही या धक्क्यातून बाहेर येऊ शकल्या नाहीत. सायरा बानो यांच्या जवळच्या व्यक्तींना त्यांची चिंता सतावत आहे. 

अभिनेते धर्मेंद्र,  शत्रुघ्न सिन्हा (hatrughan Sinha) आणि मुमताज (Mumtaz) यांना सायरा बानो यांची चिंता सतावत आहे.  या तिन्ही दिग्गज कलाकारांचे म्हणणे आहे की, त्यांनी सायरा बानू यांच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. 

पण त्यांना उत्तर मिळाले नाही. एवढंच नाही तर मुमताज पाली हिल येथील बंगल्यातही त्यांना भेटायला गेल्या, पण काही उपयोग झाला नाही. सायरा बानो कोणासोबतही सध्या बोलत नाहीत...

 

फोटो : दिलीप कुमार - सायरा बानो यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

एका वेबसाईटला  मुमताज यांनी सांगितलं की, 'युसूफजींच्या निधनाचं दुःख सायरा अद्यापही पचवू शकल्या नाहीत... मी त्यांना भेटण्याचा आणि बोलण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही...'

सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी 
सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी खास आहे. सायरा बानो अगदी 12 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली. सायरा बानो यांना कायमच दिलीप कुमार यांच्याशी लग्न करायचं होतं. 

सिनेसृष्टीत पदार्पण करताच दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ज्यानंतर दोघांनी लग्न केलं. सायरा यांचा विवाह दिलीप कुमार यांच्यासोबत झाला तेव्हा त्या अवघ्या 22 वर्षांच्या होत्या.