'श्री देवी प्रसन्न'नंतर सई झळकणार 'या' हिंदी सिनेमात! दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

सईचा श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यानंतर सईचा नवाकोरा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Updated: Feb 5, 2024, 01:28 PM IST
'श्री देवी प्रसन्न'नंतर सई झळकणार 'या' हिंदी सिनेमात! दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत title=

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हमकर ही मराठीतील अशी अभिनेत्री आहे, जिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज या अभिनेत्रीला कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. सईने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला अवघा काही वेळचं लागतो. नुकताच अभिनेत्रीचा श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. 

"श्री देवी प्रसन्न"च्या रिलीजनंतर सई पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसते आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवरील "भक्षक"मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई "जस्मीत गौर" या एका पोलिस अधिकाऱ्याचीची भूमिका साकारणार आहे. भूमी पेडणेकर , सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका यात दिसणार आहेत. सईने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे आणि आता हा नवा रोल सई कसा साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. भक्षकमध्ये भूमी सई ताम्हणकर एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार तर आहेच पण पुन्हा एकदा बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांसोबत ती ओटीटीवर दिसणार आहे.

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावे लागतं यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. 'भक्षक'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि आता 9 फेब्रुवारीला भक्षक नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.सई पहिल्यांदा रेड चिली एंटरटेनमेंट सोबत हा खास प्रोजेक्ट करणार आहे आणि यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. वर्षभरात सई नेहमीच वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. जस्मीत गौर ला बघण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.

नुकताच सईचा श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात तिने सिद्धार्थ चांदेकरने स्क्रिन शेअर केली आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. गेल्या अनेक दिवस सई ताम्हणकर सिनेसृष्टीपासून लांब होती. गेल्या अनेक दिवस चाहते ति च्या सिनेमाची वाट पाहत होते. अखेर सईच्या चाहत्यांना २०२४ मध्ये अनेक सिनेमा पाहायला मिळणार आहेत. मराठीसोबतच सई बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवताना दिसणार आहे. प्रेक्षक सईच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.