शशी कपूर यांंच्या निधनानंतर 'या' रिएलिटी शो चं शूटींगही थांबलं...

  अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजारानंतर मुंबईतील कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळी निधन झाले. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 5, 2017, 09:17 PM IST
शशी कपूर यांंच्या निधनानंतर 'या' रिएलिटी शो चं शूटींगही थांबलं... title=

मुंबई :  अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजारानंतर मुंबईतील कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळी निधन झाले. 

शशी कपूर यांच्या निधनानंतर अवघे बॉलिवूड हळहळले. मुंबईबाहेर असलेले ऋषी कपूर आणि सैफ अली खान तातडीने मुंबईमध्ये परतले. 

कलाकारांनी घेतले अंतिम दर्शन 

मुंबईत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी समवेत अनेक कलाकारांनी शशी कपूर यांचे अंतिम दर्शन घेतले. 

शूटिंग थांबवले  

अभिनेते शशी कपूर यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबईत सुरू असलेल्या  सुपर डान्सर चॅप्टर २ या रिएलिटी शो चे शूटिंग देखील थांबवण्यात आले. 

स्पेशल जज  

शिल्पा शेट्टी, फिल्म निर्माता अनुराग बासु आणि  कोरियोग्राफर गीता कपूर सुपर डान्सर चॅप्टर २ या रिएलिटी शोमध्ये जज आहेत. त्यांच्या सोबत रविना टंडन आणि गोविंदा हे दोघं स्पेशल जजच्या भूमिकेत आले होते. या खास एपिसोडचे शूट सोमवारी करण्यात आले. मात्र शशी कपूर यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी शूटिंग थांबवले.  

रविना टंडनची श्रद्धांजली  

 

 

रविना टंडनने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. सोबतच शशी कपूर यांचा एक फोटो शेअर करताना त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी कॅप्शन दिली आहे.