शैलेश लोढा नंतर आता ही अभिनेत्रीही सोडणार ‘तारक मेहता’? चाहत्यांची होणार निराशा

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो अनेकांच्या हृदयात स्थान करुन आहे.

Updated: May 23, 2022, 05:35 PM IST
शैलेश लोढा नंतर आता ही अभिनेत्रीही सोडणार ‘तारक मेहता’? चाहत्यांची होणार निराशा title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला जेव्हा कळले की शैलेश लोढा हे हा शो सोडत आहेत. 'तारक मेहता'मधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत कोणताही कलाकार शो सोडतो तेव्हा चाहत्यांची निराशा होते. शैलेश आणि निर्मात्यामध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. मात्र, दोघांनीही अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

'तारक मेहता' सोडल्यानंतर शैलेश लोढा शेमारू टीव्हीवर 'वाह भाई वाह' शो करणार आहेत. त्याचा टीझरही समोर आला आहे. आता या मालिकेला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसतंय.

मुनमुन दत्ताबद्दल यापूर्वी अनेकदा अशी शक्यता वर्तवली गेली होती की ती हा शो सोडणार आहे पण तिने प्रत्येक वेळी त्याचा इन्कार केला. आता ताज्या अहवालानुसार, मुनमुन दत्ताला निर्मात्यांनी 'बिग बॉस ओटीटी' सीझन 2 साठी संपर्क साधला आहे. या शोसाठी स्पर्धकांचा शोध सुरू झाला आहे. मुनमुन दत्ता 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी होणार की नाही याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही पण तसे झाले तर निर्माते आणि चाहते नक्कीच निराश होतील.

'बिग बॉस 15'मध्ये मुनमुन दत्ता चॅलेंजरच्या भूमिकेत दिसली होती. सुरभी चंदना, आकांक्षा पुरी आणि विशाल पुरी हे तिकीट टू फिनाले टास्कसाठी तिच्यासोबत होते. जर मुनमुनने 'बिग बॉस ओटीटी' मध्ये सहभागी होईल का यासाठी थोडी वाट पहावी लागेल.