Arjun Boney Kapoor - Malaika Arora : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 11' चे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमात अनेक चाहते आहेत. या शोची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी शोमध्ये बोनी कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी ऋत्विक धनजानी आणि गौहर खान बोनी कपूर यांना खास भेट दिली असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
बोनी कपूर यांनी हजेरी लावल्यानंतर त्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याला पाहून नेटकरी एक्सायटेड दिसत आहेत. ऋत्विक धनजानी आणि गौहर खान बोनी कपूर यांना बोलतात की तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. त्यानंतर स्क्रीनवर अर्जुन कपूर दिसतो. तो त्याचे वडील बोनी कपूर यांना चीअर करताना दिसत आहे. अर्जुन बोलताना दिसतो की हॅलो बाबा, आशा आहे की तुम्हाला शोमध्ये मज्जा येत असेल. सगळ्यात आधी तक मला हे सांगायचंय की माझे बाबा हे जगातील सगळ्यात जास्त निस्वार्थी आहेत. ते दुसऱ्यांच्या आनंदात खूप जास्त भावूक होतात. मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की माझे तुमच्यावर खूप प्रेम करतो. मी तुमचा खूप आदर करतो. प्रोफेश्नली, पर्सनली आणि एक माणूस म्हणून तुमच्यावर खूप प्रेम करतो. सगळ्यात शेवटी अर्जुन कपूर बोनी कपूरला फ्लाइंड किस दिली.
अर्जुनचा हा मेसेज पाहिल्यानंतर बोनी कपूर भावूनक झाले आणि होणारी सून मलायका त्यांना पाहून हसत होती. तर परिक्षक फराह खान तिच्या खुर्चीतून उठते आणि बोनी कपूर यांना मिठी मारते. यावेळी ती बोलते की बोनी कपूर यांची सगळी मुलं त्यांच्यावर खूप प्रेम करतात. बोनी कपूर आणखी भावूक होतात. तर त्यांना पाहून सुत्रसंचालक गौहर खान रडू लागते. इतकंच नाही तर स्पर्धक अंजलि आनंद देखील भावूक होते आणि तिला अश्रू अनावर होतात. यावर फराह बोलताना दिसते की 'ज्या मुलींचे वडील नसतात, त्यांच्यासाठी ही भावना खूप वेगळी आहे.'
हेही वाचा : 'चित्रपट चालण्यासाठी हिंसा आणि सेक्स दाखवतात...', Animal च्या यशात आमिरचा तो Video Viral
अर्जुननं त्याच्या वडिलांसाठी रेकॉर्ड केलेला हा मेसेज पाहता तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे अश्रू पाणावले. बोनी कपूर यांच्याविषयी बोलायचे झाले तर अर्जुन आणि अंशुला हे त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलं आहेत. तर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजेच श्रीदेवीची मुलं आहेत.