लग्नानंतर mouni roy चा पबमधील व्हिडिओ समोर, टेबलवर चढून जे केलं...

मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींमुळे खूपच चर्चेत आहे. 

Updated: Jan 29, 2022, 01:12 PM IST
लग्नानंतर mouni roy चा पबमधील व्हिडिओ समोर, टेबलवर चढून जे केलं... title=

मुंबई : मौनी रॉयने 27 जानेवारी 2022 रोजी तिचा प्रियकर सूरज नांबियारसोबत गोव्यात लग्न केले. दाक्षिणात्य आणि बंगाली रितीरिवाजानुसार हे लग्न पार पडले. हळद, मेहेंदी आणि संगीतानंतर, वधू आणि वरांनी लग्नात मित्रांसोबत खूप मजा केली, सध्या मौनी आणि सूरज लग्नानंतरच्या पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत.

मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींमुळे खूपच चर्चेत आहे. तिच्या लग्नानंतर आता तिने सगळ्या मित्रमंडळींना खास पार्टी दिली आहे. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींना हजेरी लावली आहे. 

मौनीच्या मित्र आणि कुटुंबासोबत करण्यात आलेल्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.ज्यात एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मौनी रॉय तिच्या गर्ल गँगसोबत बार काउंटरवर डान्स करताना दिसत आहे. गोव्यात झालेल्या या पार्टीत बॉलीवूडमधील गाण्यांवर सर्वांनी ताल धरला. 

मौनी रॉय बॉलिवूडच्या अनेक बोल्ड गाण्यांवर थिरकली आहे. तिने अनेक आयटम साँगमध्ये दिसली आहे. त्यामुळे लग्नानंतरही तिने या पार्टीत आपला जलवा दाखवला आहे.अर्जुन बिजलानीही या पार्टीत मस्ती करताना दिसत आहे. मौनी गोल्डन रंगाच्या लेहेंग्यात आहे आणि काळ्या कपड्यांमध्ये सूरजची स्टाइलही छान आहे. मौनी आणि सूरजने केक कापला आणि त्यानंतर एकमेकांना किस केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याचा व्हिडिओ ही तुफान व्हायरल झाला. यावेळी खास वेडींग केक कापण्यात आला. शिवाय, केक कापल्यानंतर मौनी आणि सूरज एकमेकांना किस करताना दिसत आहेत.