अजय देवगनच्या अभिनेत्रीचा गुपचूप विवाह, समोर आला पहिला व्हिडिओ

अभिनेता अजय देवगनसोबत 'दृश्यम' सिनेमात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री श्रिया सरन हिनं काही दिवसांपूर्वी गुपचूपपणे रशियन बॉयफ्रेंडसोबत विवाह उरकला. 

Updated: Mar 20, 2018, 12:46 PM IST
अजय देवगनच्या अभिनेत्रीचा गुपचूप विवाह, समोर आला पहिला व्हिडिओ  title=

मुंबई : अभिनेता अजय देवगनसोबत 'दृश्यम' सिनेमात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री श्रिया सरन हिनं काही दिवसांपूर्वी गुपचूपपणे रशियन बॉयफ्रेंडसोबत विवाह उरकला. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रिया आणि अॅन्ड्री यांचा विवाह हिंदू परंपरेनुसार मुंबईतच श्रिया हिच्या घरात झाला. श्रियाचा पती अॅन्ड्री हा राष्ट्राय स्तरावरचा टेनिस खेळाडू आहे. तिच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीजपैंकी फक्त मनोज वाजपेयी आणि त्याची पत्नी शबाना उपस्थित होते... मनोज-शबाना हे श्रियाचे शेजारी आहेत. 

#shriya #shriyasaran @shriya_saran1109 #shriyamarriage #shriyawedding#tollywood#bollywood#kollywood#tamilactress#teluguactress#indianactress#life#love#marriage#video#india#Trending#Trendingnow#watchvideo#follow#like#followforfollow#followback#follow4follow

A post shared by SHRIYA SARAN (@shriyasaran.fc) on

श्रिया आणि अॅन्ड्री यांच्या विवाहाचे काही फोटो आणि व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी शेअर केलेत. या व्हिडिओमध्ये लग्नाच्या वेळी श्रिया लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आणि अॅन्ड्री निळसर रंगाच्या सूटमध्ये दिसतोय.

यापूर्वी 'दृश्यम' सिनेमात श्रियाच्या मुलीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री इशा दत्ता हिनंदेखील असाच अचानक टीव्ही स्टार वत्सल शेठसोबत विवाह केला होता.