मुंबई : काश्मिरी पंडितांच्या आयुष्यावर बनलेला 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट खूप लोकांना आवडला आहे. या चित्रपटात 1990 साली काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी समोर आली आहे. आता अशाच एक सत्य घटनेवर आधारीत एक चित्रपट येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. निर्माते विपुल शाह यांनी हृदयद्रावक आणि सत्यकथेवर 'द केरळ स्टोरी' चित्रपट बनवला आहे.
विपुल शाह सत्यकथेवर आधारित 'द केरळ स्टोरी' चित्रपट बनवत आहेत. विपुल शाहचा हा चित्रपट 32 हजार बेपत्ता झालेल्या मुलींची कथा आहे, ज्या पुन्हा कधीच आपल्या घरी परतल्या नाहीत.
निर्मात्यांनी यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा 1 मिनिट 10 सेकंदाचा छोटा टीझर रिलीज केला आहे.
या टीझर व्हिडीओमध्ये तुम्गी शकतो की सुरुवातीला डिजिटल घड्याळात वेळ दर्शविली जात आहे. रात्री 11:56 ला सुरू असणारं हे घड्याळ 12:01 ला थांबतं. घड्याळ थांबल्यानंतर व्हिडीओमध्ये लिहिले आहे की, तुमची मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही तर तुम्हाला कसे वाटेल?
केरळमध्ये हजारो मुली बेपत्ता झाल्या आहेत आणि गेल्या 12 वर्षांत त्या कधीही त्यांच्या घरी परतल्या नाहीत. या व्हिडीओमध्ये मागून अनेक लोकांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत आहे.
पुढे व्हिडीओमध्ये २४ जुलै रोजीचे केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन (२००६-११) यांचे भाषण दाखवण्यात आले आहे. ते मल्यालम भाषेत बोलत आहे. पण त्याचे इंग्रजी भाषांतर व्हिडीओमध्ये आहे. व्हिडीओमध्ये पॉप्युलर फ्रंटही एनडीएफ या बंदी घातलेल्या संघटनेसारखा अजेंडा बनवत आहे आणि केरळला मुस्लिम राज्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणताना दिसत आहेत. त्यांना येत्या 20 वर्षात केरळ हे मुस्लिम राज्य बनवायचे आहे. असे देखील ते व्हिडीओमध्ये म्हणाले.
व्हिडीओमध्ये पुढे लिहिले आहे की, गेल्या 10 वर्षांपासून हजारो मुलींची ISIS आणि इतर इस्लामिक युद्धक्षेत्रांमध्ये तस्करी करण्यात आली आहे. चित्रपटाच्या नावानंतर व्हिडीओच्या शेवटी लिहिले आहे की, ही कथा ३२ हजार मुलींची सत्यकथा आहे.
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता अनेक निर्माते आपल्या चित्रपटातून सत्य लोकांसमोर आणण्याचे धाडस दाखवू लागले आहेत. आता हा टिझर पाहिल्यानंतर लोकांमध्येही हा चित्रपट पाहण्याची इच्छा झाली आहे.