आमिर खान इम्रान खानला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार?

जाणार का आमीर खान?

आमिर खान इम्रान खानला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार?  title=

मुंबई : पाकिस्तानमध्ये अनेक प्रसंगानंतर अखेर इमरान खान यांच्या पार्टीचा म्हणजे पाकिस्तान तहरीक ए इंसाकचा विजय झाला आहे. यासोबतच माजी क्रिकेटर आणि पीटीआयचे अध्यक्ष इमरान खानची पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रसंगावर सोशल मीडियाला अचानक आमिर खानचे 5 वर्षापूर्वीचे वचन आठवले आहे. आमिर खानला आपलं हे वचन आठवून देण्यासाठी अभिनेता अली जफर यांनी मदत केली आहे. 

5 वर्षापूर्वी आमीर खानने दिलं हे वचन 

2012 साली आमीर खानने भर कार्यक्रमात इमरान खानला वचन दिले होते. इमरान खानच्या राजकारणातील विजयानंतर आपण पाकिस्तानमध्ये येऊ असं वचन दिलं होतं. आमीर खान असं म्हणाला होता की, जेव्हा तू निवडणूक जिंकशिल तेव्हा मी स्वतः तिथे येऊन म्हणजे पाकिस्तानमध्ये आनंद साजरा करणार असल्याचं सांगितलं होतं. मी माझ्यासोबत अनेक भारतीय घेऊन येईन असा शब्द देखील दिला आहे. 

आता पाकिस्तानमध्ये येण्याची आली वेळ

आमिर खानने 5 वर्षापूर्वी वचन दिलं होतं. या वचनाची आता आठवण करून सोशल मीडियावर ट्विटर युझर सयैद सैफ मंसूरने ट्विट केलं आहे की, अली आपले बॉलिवूड कलाकारांशी चांगले संबंध आहे. कृपया हा संदेश तुम्ही आमीर खानला द्या. आणि इमरान खानला दिलेलं वचन आठवून पाकिस्तानमध्ये येण्यास सांगा.