ड्रग्स चौकशीनंतर दीपिकाची सोशल मीडियावर पहिली पोस्ट

दीपिकाची एनसीबीने केली होती कसून चौकशी 

Updated: Oct 23, 2020, 05:32 PM IST
ड्रग्स चौकशीनंतर दीपिकाची सोशल मीडियावर पहिली पोस्ट title=

मुंबई : २०२० हे वर्ष अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी अतिशय कठीण गेलं आहे. कोरोनाच्या काळात दीपिकाचा मेगा बजेट सिनेमा 83 हा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत ड्रग्स प्रकरणात दीपिका वाईट पद्धतीने फसली. एनसीबीने दीपिकाशी गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात चौकशी केली. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्स प्रकरणाबाबत एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. 

एनसीबीच्या चौकशीनंतर आज दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तब्बल एका महिन्यानंतर दीपिका सोशल मीडियावर ऍक्टिव झाली आहे. दीपिकाने आपला मित्र आणि सहकलाकार प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दीपिकाने आपल्या इंस्टा स्टोरीवर प्रभासचा फोटो शेअर करत आहेत. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय की,'तू कायम निरोगी आणि आनंदी राहा. आशा करते की, तुला हे वर्ष आनंदी जाऊ दे.' 

प्रभासचे अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या यादीत आदीपुरूष ते अगदी राधेश्याम सिनेमांचा समावेश आहे. अनेक मेगा बजेट सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत. या यादीत प्रभास दीपिकासोबत देखील दिसणार आहेत. या सिनेमाबाबत दीपिकाच्या नावाची घोषणा तर झालेली नाही. मात्र दीपिकानेच स्वतः एका सिनेमाची घोषणा केली आहे.