एक्स बॉयफ्रेंडला धोका, आता 'या' व्यक्तीसोबत करणार लग्न

बॉलिवूड इंडस्ट्री ते टिव्ही इंडस्ट्रीपर्यंत सगळीकडेच सध्या लग्नाची धुमधाम पहायला मिळत आहे.

Updated: Nov 16, 2021, 07:07 PM IST
एक्स बॉयफ्रेंडला धोका, आता 'या' व्यक्तीसोबत करणार लग्न title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्री ते टिव्ही इंडस्ट्रीपर्यंत सगळीकडेच सध्या लग्नाची धुमधाम पहायला मिळत आहे. नुकतीच राजकुमार रावने लाँग टाईम गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत लग्नगाठ बांधली. तर दुसरीकडे अनेक एक्ट्रेस लग्नबंधनात अडकण्यासाठी तयार आहेत. टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि श्रद्धा आर्यानंतर कुंडली भाग्य फेम अभिनेत्री मानसी श्रीवास्तवच्या लग्नाच्या बातम्या सगळीकडे आहेत. रिपोर्टनुसार, मानसी लवकरच लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड कपिल तेजवानीसोबत सातफेरे घेणार आहे. 

मानसी ज्याच्यासोबत लग्न करणार आहे तो एक फूड ट्रॅव्हलर आणि फोटोग्राफर आहे. एका रिपोर्टनुसार, एका शूट दरम्यान या दोघांची भेट झाली होती. दोघंही 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का? मानसी अनिल तेजवानीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी टिव्ही एक्टर मोहित अबरोलला जवळ-जवळ 8वर्ष डेट केलं होतं. मानसीच्या एक्स बॉयफ्रेंड मोहित अबरोल म्हण्यानुसार तो आणि मानसी लिवईन रिलेशनशिपमध्ये होते.

रिपोर्टनुसार, मानसी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड आपलं प्रेम पुढे घेवून जायला ईच्छित होते. 2016मध्ये या कपलने साखरपुडा देखील केला. लवकरच हे कपल लग्न करणार होतं. मात्र म्हणतात ना तुमच्या नशिबात असेल तेच तुम्हाला मिळतं. असंच काहीसं अभिनेत्रीच्या बाबतीत झालं. साखरपुड्यानंतर मानसी आणि मोहितचं ब्रेकअप झालं. ज्यानंतर दोघांनीही आपला साखरपुडा मोडला.

मानसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं की, मानसीने त्याला धोका दिला आहे. मोहितने हा देखील खुलासा केला होता की, प्रेमात धोका मिळाल्यानंतर त्याने एकदा सुसाईड करण्याचाही प्रयत्न केला. मात्र काही वेळातच अभिनेत्याने ही पोस्ट सोशल मीडियावरुन हटवली.

मोहितने आपल्या पोस्टमध्ये खुलासा केला होता की, त्याच्यासोबत नात्यात असताना ती कपिल तेजवानी नावाच्या युवकाला डेट करत होती. जो एक ट्रॅव्हलर फोटोग्राफर होता. आता मानसी कपिल तेजवानीसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. मात्र अभिनेत्रीने अद्याप तरी याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.