'मी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले, तर ती आत्महत्या समजू नका'

माझ्या नैराश्याची कहाणी तयार ठेवली आहे..... 

Updated: Sep 25, 2020, 07:48 AM IST
'मी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले, तर ती आत्महत्या समजू नका' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपासून कलाविश्वात पुन्हा एकदा लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आला आहे. यामध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप anurag kashyap याचं नाव पुढे येत आहे. अभिनेत्री पायल घोष payal ghosh हिनं अनुरागवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत काही धक्कादायक खुलासेही केले. इतकंच नव्हे, तर तिनं या प्रकरणी थेट पोलिसांचं दारही ठोठावत अनुराग विरोधात तक्रारही दाखल केली. 

आता पुन्हा एकदा पायलनं काही धक्कादायत वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput याच्या मृत्यू प्रकरणाला अधोरेखित करत तिनं आपली हत्या होण्याची भीती व्यक्त केली आहे. तिच्या या खळबळजनक वक्तव्यामुळं आता भलत्याच चर्चांनी जोर धरला आहे. 

सोशल मीडियावर पायलनं स्वत:चा एक फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मिस्टर अनुराग कश्यपविरोधात मी एका प्रसिद्ध पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत काही खुलासे केले होते. ज्यानंतर मला कळलं की त्यासाठी खुद्द अनुराग कश्यप यांच्याच परवानगीची गरज होती असं मला कळलं'. देशातील जनतेला उद्देशून पायलनं लिहिलं, 'मी घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत सापडले तर एक लक्षात ठेवा, मी आत्महत्या केलेली नाही. त्यांच्याकडे माझ्या नैराश्याची आणि औषधोपचाराची कहाणी तयार आहे'. 

 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोष हिनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणानं डोकं वर काढलं. अनुराग कश्यपनं माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती. याबाबत सांगणं माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षितताही धोक्यात असल्याचं सांगत, तिने मदतीची विनंती केल्याचं पाहायला मिळालं होतं.