Alia Bhatt नंतर Deepika Padukone पण देणार गुड न्यूज?

Deepika Padukone Pregnancy: आलिया भट्टनंतर आता दीपिका पदुकोणही गुड न्यूज देणार आहे. याबाबत खुद्द दीपिकाने खुलासा केला आहे. नेमकं दीपिका प्रेग्नेंसीबाबत काय म्हणाली ते जाणून घेऊया...

Updated: Jan 19, 2023, 12:05 PM IST
Alia Bhatt नंतर Deepika Padukone पण देणार गुड न्यूज? title=

Deepika Padukone-Ranveer Singh Baby:  गेल्या काही दिवसापासून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही गुडन्यूज कधी देणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपीकाने खुद्द प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे. 

बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) . रणवीर आणि दीपिकाच्या (Deepika and Ranveer Marriage)  ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दीपिका आणि रणवीर दोघेही एकमेकांविषयी नेहमी विविध गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. तसेच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या प्रोफेशनललाईफमुळे चर्चेत असते. दीपिका पदुकोणने 2018 साली अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

त्याच वेळी, एका मुलाखतीत दीपिका पादुकोण कुटुंब नियोजनाबद्दल बोलताना दिसली आहे. त्यावेळी तिने 10 वर्षाचं संपूर्ण नियोजन शेअर केले. पुढील दहा वर्षात ती अशा ठिकाणी असेल जिथे तिच्या आजुबाजूला 3 मुले खेळत असतील, ज्या मुलांना ती शूटिंगलाही घेऊन जाणार असल्याचे या मुलाखतीत सांगितले. तसेच त्यांचे एक लहान आणि सुखी कुटुंब असले अशी माहिती तिने मुलाखतीदरम्यान दिली. 

तसेच एका मुलाखतीदरम्यान रणवीर सिंहलाही (Ranveer Singh) त्याच्या बाळाबद्दल विचारण्यात आले. जर भविष्यात तुला आणि दीपिकाला मुलगी झाली तर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव काय ठेवणार?’ असा प्रश्न रणवीरला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रणवीर म्हणाला, “मी बाळाच्या नावाची एक लांबलचक यादी तयार केली आहे.

पण एवढ्यात मी ती नावं उघड करणार नाही.” “मला लहान मुलं प्रचंड आवडतात. मला त्यांची नाव फार हटके असावीत असे वाटते. आम्ही गेल्या काही दिवसांपासून यावर बाळाच्या नावावर चर्चा करत आहोत. पण ही नाव थोडी गुपित ठेवण्यात आली आहेत. कारण ती कोणीतरी दुसऱ्याने चोरुन ठेवावी, असे मला वाटत नाही”, असं यावेळी रणवीर सिंह म्हणाला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दीपिका ही प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.