अक्षय कुमारनंतर 'या' साउथ अभिनेत्याने नाकारली पान मसाल्याची जाहिरात, मिळणार होती मोठी रक्कम

काही दिवसांपूर्वीच हृतिक रोशनने अशाप्रकारची जाहिरात करताना पाहून चाहते भडकले होते. सध्या अशी माहिती समोर येत आहे की, पान मसाला कंपनीने साउथ अभिनेत्याशी संपर्क साधला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 30, 2024, 06:55 PM IST
अक्षय कुमारनंतर 'या' साउथ अभिनेत्याने नाकारली पान मसाल्याची जाहिरात, मिळणार होती मोठी रक्कम title=

R. Madhavan : पान मसाला कंपनीच्या जाहिरातीवरून बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अनेकदा चर्चा होताना दिसते. यामध्ये अभिनेता अजय देवगण, हृतिक रोशन, शाहरुख खान आणि  टायगर श्रॉफ हे आजही फ्लेवर्ड वेलचीच्या जाहिरातीमध्ये  दिसतात. यामध्ये सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारही दिसला होता. मात्र, आता अक्षय कुमारने पान मसाला कंपनीच्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

काही दिवसांपूर्वीच अभिनेता हृतिक रोशनने अशाप्रकरची एक जाहिरात केली होती. ते पाहून चाहते देखील त्याच्यावर खूप संतापले होते. त्यानंतर सध्या सोशल मीडियावर पान मसाला कंपनीच्या काही बातम्या समोर येताना दिसत आहेत. ज्यामध्ये या कंपनीने साउथ अभिनेता आर माधवन याला पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी संपर्क साधला होता. मात्र, अभिनेत्याने ही जाहिरात करण्यासाठी नकार दिला आहे. 

आर माधवनकडून जाहिरात करण्यास नकार

अभिनेता अक्षय कुमार नंतर साउथ अभिनेता आर माधवन याला देखील पान मसाला कंपनीने संपर्क साधला आहे. मात्र, अभिनेत्याने ही जाहिरात करण्यासाठी नकार दिला आहे. पान मसाला कंपनीने या जाहिरातीसाठी आर माधवना मोठ्या रक्कमेची ऑफरही दिली होती. परंतु अभिनेत्याने ही जाहिरात करण्यास नकार दिला.

अभिनेता म्हणाला की, तो कोणत्याही प्रकारच्या पान मसाल्याचा प्रचार करत नाही. आर माधवनला ही त्याच्या प्रेक्षकांप्रती असलेली जबाबदारी समजते. त्याच्या मते प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल अशा प्रकारची कोणतीही जाहिरात किंवा गोष्ट तो कधीच करत नाही. 

जाहिरातीस नकार दिल्यानंतर चाहत्यांकडून कौतकु

पान मसाला ही कंपनी सध्या त्यांचा ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याच दिसत आहे. त्यामुळे ही कंपनी सर्वात मोठा चेहरा असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. अशातच या कंपनीने साउथ अभिनेता आर माधवनला देखील संपर्क साधला होता. मात्र, अभिनेत्याने अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी नकार दिला आहे. अभिनेत्याने नकार दिल्यामुळे चाहते देखील त्याच कौतुक करत आहेत. सध्या कंपनी त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी मोठ्या चेहऱ्यांना शोधत आहेत.