मुंबई : बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि 'झक्कास' बॉय अनिल कपूर तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. इंद्र कुमार दिग्दर्शित 'टोटल धमाल' या चित्रपटात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र काम करणार असल्याने चाह्त्यांमुळे कमालीची उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी 18 वर्षांनी पुन्हा दिसत असली तरीही इंद्रकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली या दोघांना पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र आणण्याची किमया 26 वर्षांनी अनुभवता येणार आहे. यापूर्वी इंद्र कुमार, अनिल कपूर आणि माधुरी यांनी 'बेटा' सिनेमात एकत्र काम केले होते.
माधुरी दीक्षित,अनिल कपूर आणि सोबत इंद्र कुमार हे त्रिकुट पुन्हा 26 वर्षांनी आलं आहे. या चित्रपटाचं टायटल ट्रक शूट झालं आहे. आमचं बॉडिंग 'बेटा' सिनेमाइतकंच ताज असल्याचा खास मेसेज त्यांनी इंस्टाग्रामपोस्टमध्ये लिहला आहे.
टोटल धमालच्या सेटवरून अनिल कपूर यांनी हा खास फोटो शेअर केला आहे.
'धमाल' या फ्रेंचाईजीचा हा तिसरा सिनेमा आहे. या चित्रपटाचा निर्माता अजय देवगण प्रोडक्शन आणि फोक्स स्टार स्टुडिओ आहे. अनिल कपूर, माधूरी दीक्षित यांच्या सोबतीने या चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख, संजय मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.