नवी दिल्ली : लेबनॉनची राजधानी असणाऱ्या बैरूतमध्ये काही दिवसांपूर्वी एक भीषण स्फोट झाला. अमोनियम नायट्रेटच्या या स्फोटामुळं मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली. जनजीवनाची घडी अशी काही विस्कली जी पुन्ही एकदा बसवायचं म्हटलं तरी सुरुवात कुठून करायची असाच प्रश्न बैरुत आणि त्यानजीकच्या परिसरातील नागरिकांना पडत आहे. या घटनेला आता काही दिवस उलटले असले तरीही त्याचे परिणाम मात्र कायम आहेत.
मृतांचा आकडा वाढत आहे, जखमींनासुद्धा काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही सर्व हानी पाहता आता अनेकांनी सढळ हस्ते या स्फोटातील पिडीतांसाठी मदतीचा हात पुढं केला आहे. यामध्ये ऍडल्ट स्टार मिया खलिफा हिनंही पुढाकार घेतला आहे.
इन्स्टाग्राम पोस्ट लिहित मियानं आपण नेमकं कशी मदत करणार, याबाबतची माहिती दिली. 'मी थोडं क्रिएटीव्ह होण्याचा प्रयत्न करतेय. एखाद्या कामासाठी मतदनिधी उभारण्यासाठी अनेक मार्ग निवडले जाऊ शकतात. मात्र यामुळं मुख्य हेतूवरुन लक्ष विचलित होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे', असं मियानं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
ही लक्षवेधी पोस्ट लिहित मियानं एका खास वस्तूचा लिलाव करण्याचा निर्णय़ घेतला. एका चाहत्यानं ही वस्तू तब्बल एक लाख डॉलर्सची बोली लावत ही वस्तू विकत घेतली. मियानं बैरुत स्फोट पिडीतांसाठी लिलावात विकलेली ही वस्तू म्हणजे तिचा चष्मा. भारतीय चलनाप्रमाणे पाहिल्यास या चष्म्याचा लिलाव करत मियानं पिडीतांसाठी ७४ लाखांहून अधिक रक्कम मिळवली आहे. इतकंच नव्हे, तर मियाने तिच्या इतरही काही वस्तू लिलावासाठी उपलब्ध केल्या आहेत. ज्याच्या लिलावातून जवळपास २५ हजार डॉलर्सचा निधी गोळा करण्याचा तिचा हेतू असल्याचं कळत आहे.