सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली अदा शर्मा का म्हणते 'मनात आलं...'?

Adah Sharma Sushant Singh Rajput Flat : अदा शर्मा सुशांत सिंग राजपुतच्या घरात झाली शिफ्ट... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 3, 2024, 12:10 PM IST
सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली अदा शर्मा का म्हणते 'मनात आलं...'? title=
(Photo Credit : Social Media)

Adah Sharma Sushant Singh Rajput Flat : गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री अदा शर्मा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या मुंबईत असलेल्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. गेल्या वर्षीच अदानं हा फ्लॅट भाड्यावर घेतला होता. याविषयी तिनं आता पर्यंत कोणतीही माहिती दिली नव्हती. तिनं सांगितलं होतं की ती जेव्हाही असं करेल तेव्हा ती याविषयी नक्कीच माहिती देईल. दरम्यान, आता अदानं या सगळ्या चर्चांना कन्फर्म केलं आहे. ती 4 महिन्यांपूर्वी त्या अपार्टमेंटमधअये शिफ्ट झाली आहे. तिचं म्हणणं आहे की ‘द केरल स्टोरी’ आणि ‘द बक्सर स्टोरी’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. त्यानंतर ती मथुराच्या एलिफेंट सेंक्चुरीमध्ये काही दिवस थांबली. अदानं सांगितलं की तिला आता तिच्या या नव्या अपार्टमेंटमध्ये घरी असल्याचं जाणवतं. 

आता अशी माहिती समोर आली आहे की ऑक्टोबर 2023 मध्ये अदानं सुशांतच्या फ्लॅटला 3 वर्षांसाठी भाड्यावर घेतलं आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अदानं सांगितलं की ती चार महिन्यांपूर्वी सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. शिफ्ट झाल्याच्या नंतर मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाले. मला जास्त वेळ मिळाला नाही. त्यानंतर मी मथुराच्या एलीफेंट सेंच्युरीला गेले होते. तिथून परतल्यानंतर आता या फ्लॅटमध्ये राहते आहे. माझी आई आणि आजी आम्ही एकत्र या फ्लॅटमध्ये राहत आहोत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अदानं पुढे सांगितलं की मला आता थोडा वेळ मिळाला आहे. त्यामुळे मी या फ्लॅटमध्ये पूर्णपणे सेटल होऊ शकले आहे. मी आधी पाली हिलच्या घरात रहायचे. तिथेच माझं बालपण गेलं. तिथे माझ्या खूप आठवणी आहेत. पहिल्यांदा असं झालं आहे जेव्हा मी मुंबईत कुठे शिफ्ट झाले आहे. तर या फ्लॅटमध्ये मला खूप पॉझिटिव्ह वाइब्स देतं. वाइब्सला घेऊन मी खूप सेन्सिटिव्ह आहे.  

'द केरल स्टोरी' दरम्यान, मी बराचवेळ निसर्गाच्या सानिध्यात होते. तेव्हा मला वाटलं की मी अशा ठिकाणी शिफ्ट व्हायला हवं. जिथे मी पक्षी पाहू शकेल त्यांचा सांभाळ करु शकेल. त्यांना खायला देऊ शकेल. ज्या घरात मी रहायचे तिथे जागा थोडी कमी होती. त्यामुळे या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले, यात मी पक्ष्यांना खाऊ घालू शकते आणि मी माझं स्वप्न पूर्ण करते. या घरात खूप जागा आहे जी माझ्या कामाची आहे. मला नेहमीच असं घर हवं होतं जिथून चांगला व्ह्यू  आणि स्पेस मिळेल. मी नेहमीच माझ्या इन्ट्यूशनवर विश्वास ठेवत आले. मी कधीच कोणाचा सल्ला घेतला नाही. अनेकांनी मला घाबरवलं की एका हॉरर चित्रपटातून म्हणजेच भयपटातून करिअरची सुरुवात करायला नको. पण मी कोणाचं ऐकलं नाही. पुढे देखील माझा तोच अॅटिट्यूड राहिला. 

अदासनं सांगितवंलं की अनेकांनी तिला हा फ्लॅट घेऊ नकोस असं सांगितलं. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. अदानं 3 वर्षांसाठी हा फ्लॅट भाड्यावर घेतला आहे. अदानं या फ्लॅटला युनिक लाइफ स्टाइलमध्ये कन्व्हर्ट केलं आहे. तिनं संपूर्ण फ्लॅटला पांढरा रंग दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, तिनं खालच्या मजल्यावर एक मंदिर केलं आहे. वरच्या मजल्यावर एका रुमला म्यूजिक रुम, दुसरा डान्स स्टूडिय आणि टेरेसवर झाडं लावली आहेत. 

हेही वाचा : रवीना टंडन 'तेव्हा' दारूच्या नशेत? त्या क्षणी नेमकं काय घडलं? पोलिसांनी स्पष्टच सांगितलं...

अदानं घरात खूप कमी फर्निचर ठेवलं आहे. तिच्या लाइफ स्टाईलमध्ये जमिनीवर झोपणं आणि जमिनीवर बसून जेवणं आहे. ऑगस्ट 2023 मध्ये अदानं या अपरार्टमेंटला भाड्यावर घेण्याची प्रतिक्रिया सुरु केली होती. रिपोर्ट्सनुसार, डिसेंबर 2019 मध्ये या फ्लॅटसाठी सुशांत सिंह राजपुत हा 4.5 लाख रुपये महिन्याचं भाडं देत होता.