'तुझ्या आधी माझा मृत्यू झाला तर..', ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला दिली वॉर्निंग

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. दोघांनी 2001 मध्ये लग्न केले. दरम्यान, ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला वॉर्निंग दिली आहे. काय आहे वॉर्निंग ? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 11, 2024, 07:37 PM IST
'तुझ्या आधी माझा मृत्यू झाला तर..', ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला दिली वॉर्निंग  title=

Twinkle Khanna : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात जुने कलाकार आहेत. दोघांनी 2001मध्ये लग्न केले. त्यांना  दोन मुले आहेत. ट्विंकल खन्ना ही मजेदार शैलीसाठी ओळखली जाते. यावेळी ट्विंकल खन्नाने अक्षयच्या दुसऱ्या लग्नाविषयी सांगितले आहे. तिने म्हटले आहे की, जर तिचा अक्षय कुमारच्या आधी मृत्यू झाला तर अक्षय कुमारने पुन्हा लग्न करावे असे तिला वाटत नाही. 

मीडिया रिपोर्टनुसार, टूर गाइडने तिची टिक-टिक नावाच्या पक्ष्यांच्या जोडीशी ओळख करुन दिली होती. असे मानले जाते की हे पक्षी एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे आहेत की त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला की दुसरा पक्षी देखील विषारी गवत खाऊन आत्महत्या करतो. 

ट्विंकल खन्नाने दिली अक्षयला वॉर्निंग 

हे सर्व ऐकल्यानंतर ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला सांगितले की, जर तिचा पहिला मृत्यू झाला तर अक्षय कुमारने दुसरं लग्न करण्याऐवजी विषारी गवत खावे. त्यानंतर ट्विंकल खन्नाने अक्षयला इशारा देखील दिला की, जर माझ्या मृत्यूनंतर अक्षयने दुसरे लग्न केल्याचे समजले तर मी परत येईल आणि त्या दोघांना त्रास देईल. 

ट्विंकल खन्नाच्या प्रश्नावर अक्षय कुमार काय म्हणाला? 

ट्विंकल खन्ना म्हणाली की, जर अक्षय कुमारची दुसरी पत्नी माझी हँडबॅग घेऊन फिरताना दिसली तर मी परत येईन आणि तुम्हा दोघांना त्रास देईन. त्यावर अक्षय कुमारने उत्तर दिले की, मला ते विषारी गवत आत्ताच खायचे आहे, निदान तेव्हा तरी मला हे सर्व बकवास ऐकावा लागणार नाही.