बोल्ड अँड ब्युटिफूल 'अप्सरा'..सोनाली कुलकर्णीचा घायाळ करणारा लूक

सध्या सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसोबत मेक्सिकोत हनीमून एन्जॉय करत आहे. या दरम्यान तिने काही फोटोज शेअर केले आहेत.

Updated: May 23, 2022, 09:58 AM IST
बोल्ड अँड ब्युटिफूल 'अप्सरा'..सोनाली कुलकर्णीचा घायाळ करणारा लूक title=

मुंबईः नववारी साडीत अप्सरा बनून सर्वांना थिरकायला लावणारी सोनाली कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते. सध्या सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसोबत मेक्सिकोत हनीमून एन्जॉय करत आहे. या दरम्यान ती तिचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोजमुळे तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच अपडेट असते. आता बीचवरील बिकीनी लूकमध्ये फोटोशूट केलं असून तिचा बोल्ड लूक फ्लॉन्ट केला आहे. नववारी साडीत प्रेक्षकांची मनं जिंकणारी सोनाली कुलकर्णी बिकीनीतही तितकीच बिनधास्त दिसत आहे.

तिचा हा बोल्ड आणि बिनधास्त लूकही तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोजवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा लग्न केल्याने ती चर्चेत आली होती. कोरोनामुळे तीन वेळा लग्न स्थगित करावं लागलं होतं. अखेर सर्वांच्या उपस्थितीत सोनाली आणि कुणालने पुन्हा एकदा लग्न केलं आणि आता हे कपल मेक्सिकोत हनीमून एन्जॉय करत आहे.