सलमानने बॉलिवूडमध्ये आणलेल्या या अभिनेत्रीचं ब्रेकअप झाल्याची चर्चा

आणख्या एका बॉलिवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप

Updated: Jun 19, 2019, 02:16 PM IST
सलमानने बॉलिवूडमध्ये आणलेल्या या अभिनेत्रीचं ब्रेकअप झाल्याची चर्चा title=

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये अनेकांचे ब्रेकअप झाले आहे. त्यात आता आणखी एक नाव जुडलं आहे. अभिनेता सलमान खानने जिला बॉलिवूडमध्ये आणलं. अभिनेत्री ऐश्वर्या सारखी दिसत असल्याने ती चांगलीच चर्चेत आली. पण फार काळ ती बॉलिवूडमध्ये टिकू शकली नाही. ती म्हणजे अभिनेत्री स्नेहा उल्लाल . स्नेहा उल्लाल ही गेल्या अनेक दिवसांपासून ऑल इंडिया मिक्स्ड मार्किलल आर्ट्स एसोसिएशन (AIMMAA) संचालक अवी मित्तलला डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र त्यांच नात फार काळ टीकू शकलेलं नाही. आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

स्पॉटबॉयच्या बातमीनुसार, स्नेहा आणि अवी यांच नातं आता तुटलेलं आहे. एकत्र वॅलेंटाइन्स डे साजरा केल्यानंतर काही दिवसातच त्यांचं नातं तुटलं. सध्या स्नेहा कोणत्याही मुलाला डेट करत नाही. तर दुसरीकडे स्नेहा सोबत नातं तुटल्याने अवीने देखील स्वत:ला कामात गुंतवून घेतलं आहे. 

Image result for Actress sneha Ullal break up zee

दुसरी बातमी अशी आहे की, स्नेहाच्या जीवनात अवी व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. स्पॉटबॉयच्या बातमीनुसार, स्नेहा आणि अवी अनेक काळापासून चांगले मित्र-मैत्रीण होते, पण हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. स्नेहा आणि अवीच्या नात्याबद्दल त्यांच्या घरी सुद्धा माहित होतं. अनेकदा स्नेहा अवीच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होत होती. स्नेहा उल्लाल अभिनेता सलमान खान बरोबर २००५ मध्ये आलेल्या लकी- नो टाईम फॉर लव या चित्रपटात झळकली होती. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सारखी दिसत असल्याने तेव्हा ती चांगलीच चर्चेत आली. 

Image result for Actress sneha Ullal break up zee

सलमानचा भाऊ सोहेल खानसोबत 'आर्यन' या चित्रपटात देखील तिने काम केलं होतं. पण हा सिनेमा बॉक्सऑफिसवर कमाल करु शकला नव्हता. बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याने स्नेहाने तेलगु चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती.