''मी लग्न वाचवायचा प्रयत्न केला पण...'' घटस्फोटानंतर shweta tiwari चा मोठा खुलासा

सध्या तिची ही मुलाखत सगळीकडे व्हायरल होते आहे.

Updated: Sep 11, 2022, 04:13 PM IST
''मी लग्न वाचवायचा प्रयत्न केला पण...'' घटस्फोटानंतर shweta tiwari चा मोठा खुलासा title=

Shweta tiwari on marriage: बिग बॉस (big boss) या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (shweta tiwari) सध्या आपल्या मुलीप्रमाणेच कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचं नवनवीन फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत असतात. अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा सोशल मीडियवर चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिनं तिच्या लग्नाबद्दल विशेषत: तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत. (actress shweta tiwari opens about her marriage life says that her daughter think before marrying someone see what she says) 

आपल्या लग्नाविषयी बोलताना तिनं असेही सांगितले की ती आपल्या मुलीलाही लग्न न करण्याचा सल्ला देते. सध्या तिची ही मुलाखत सगळीकडे व्हायरल होते आहे. 

मुलाखतीत बोलताना ती असं म्हणाली की मी माझे पहिले लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला कारण मला समाजात राहायचे होते मात्र मी हेच माझ्या दुसऱ्या लग्नात त्या चुका न करण्याचा प्रयत्न करत आहे ज्या मी माझ्या पहिल्या लग्नात केल्या. मला माहित होते की ते खराब झाले तर ते आणखी वाईट परिस्थिती उद्भवणार, मी ते वाचवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही.

अभिनेत्री पुढे म्हणाली, माझा लग्नावर विश्वास नाही. खरं तर, मी माझ्या मुलीला लग्न करू नकोस असंही सांगते. एकतर तिचं जीवन आहे आणि तिच्या वैयक्तिक आय़ुष्यातही फार ढवळाढवळ करू शकत नाही. पण लग्नाअगोदर तिनं आधी चांगला विचार करावा असे मला वाटते. 

केवळ तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात म्हणून लग्न करण्याची गरज नाही असेही ती म्हणाली. आयुष्यात लग्न होणं खूप महत्त्वाचं असतं आणि लग्नाशिवाय आयुष्य कसं जाईल हे आपल्याला माहिती नसतं. असं म्हणतात की प्रत्येक लग्न हा प्रकार फार नाजूक असतो. माझे अनेक मित्र आहेत जे सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत आणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे.

पण मी माझ्या काही मित्रांना तडजोड करत लग्न जपताना पाहिले आहे, जे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी चांगले नाही. म्हणून, मला माझ्या मुलीला सांगायचे आहे की तिला आनंद होईल असे तिने काहीतरी करावे, परंतु ते सामाजिक दबावाखाली राहून नाही. 

श्वेता तिवारी नुकतीच मेरे डॅड की दुल्हन या चित्रपटातून दिसली होती.