मुंबई : मालिकांमधून विविधरंगी भूमिकांना न्याय देणाऱ्या अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) नं तिचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अनेक वर्षांपासून श्वेताला प्रेक्षक पाहत आले आहेत, पण तिच्यामध्ये वाढत्या वयाचा लवलेषही पाहायला मिळत नाही. बोल्ड अदा आणि तितकाच दमदार फिटनेस यांच्या बळावर श्वेता आतापर्यंत चाहत्यांची मनं जिंकत आली आहे.
वयाची चाळीशी ओलांडून पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या श्वेतानं आता म्हणे इतकं बोल्ड़ वक्तव्य केलं आहे की ऐकणाऱ्यांच्या भुवया उंचावत आहेत.
भोपाळमध्ये तिनं देवाचं नाव घेत हे वक्तव्य केल्य़ाचं म्हटलं जात आहे. आगामी वेब सीरिजच्या कामानिमित्त ती भोपाळला पोहोचली होती.
जिथं सीरिजच्या संपूर्ण स्टारकास्टसोबतच्या एका पत्रकार परिषदेत ती सहभागी झाली होती. इथंच श्वेतानं असं वक्तव्य केलं की उपस्थितांसोबतच आता जे कोणी हे वाचत आहे त्यांनाही धक्का बसत आहे.
'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे', असं श्वेता म्हणाली आणि तिच्याकडे सर्वांच्याच नजरा वळल्या.
'शो स्टॉपर' (Show Stopper) या सीरिजच्या निमित्तानं एका चर्चेदरम्यान, तिनं हे वक्तव्य केल्याचं कळत आहे.
तिनं जरी मजामस्करीत हे वक्तव्य केलं असलं तरीही त्याची जोरदार चर्चा मात्र सुरु झाली आहे.
बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्वेतानं हे बोल्ड वक्तव्य नेमकं काय हेतूनं केलं हाच प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे, तर काहींनी तिच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.