शॉर्ट ब्लॅक वन पीसमध्ये शहनाज गिलचा हॉट लूक...सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री शहनाज गिलने नुकतंच तिचं हॉट फोटोशूट केलं आहे. शहनाजचे फोटो पाहून तुमचाही काळजाचा ठोका चुकेल.

Updated: May 16, 2022, 03:17 PM IST
शॉर्ट ब्लॅक वन पीसमध्ये शहनाज गिलचा हॉट लूक...सोशल मीडियावर धुमाकूळ title=

मुंबईः अभिनेत्री शहनाज गिलने नुकतेच तिचं हॉट फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिच्या किलर लूकने ती चाहत्यांना घायाळ करत आहे. शहनाजचे फोटो पाहून तुमचाही काळजाचा ठोका चुकेल.

'बिग बॉस'ने ज्यांचं आयुष्यात बदललं त्यात पहिल्या क्रमांकावर शहनाज गिलचं नाव येतं. शहनाज गिलला बिग बॉसनंतरही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि ती चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडेच शहनाजने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवत आहेत.

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीनं हे शहनाज गिलचं फोटोशूट केलंय.. या फोटोंमध्ये शहनाज तिचा किलर लूक दाखवताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमध्ये शहनाज गिल ब्लॅक कलरच्या शॉर्ट वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. लूक अधिक सुंदर करण्यासाठी अभिनेत्रीने केस बांधले आहेत. शहनाजनेही तिचा मेकअप खूप बोल्ड ठेवला आहे आणि तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ब्लॅक हील्स परिधान केली आहेत.

शहनाज गिल दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते आणि शहनाजचे हे मनमोहक फोटो पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

शहनाज गिल लवकरच सलमान खानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच या सिनेमातील एक फोटोही शेअर करण्यात आला होता.