Casting Couch: ग्लॅमरस जगातले कास्टिंग काउचसारखे (Casting Couch In Bollywood) घृणास्पद सत्य आपल्या सर्वांसमोर अनेकदा आले आहे. या मुद्द्यावर अनेक स्टार्स खुलेपणाने बोलले आहेत. मध्य़ंतरी मीटू सारख्या चळवळीमुळेही I(Me too Movement in Bollywood) अशा प्रकरणांना वाचा फुटली होती. आता या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री शमा सिकंदरच्या (Actress Shama Sikandar) नावाचाही समावेश झाला आहे. कास्टिंग काउचबाबतचा अनुभव त्याने पहिल्यांदाच जगासमोर मांडला असल्याची बातमी समोर आली आहे. (actress shama sikander reacts on casting couch says now the time has changed and now now they respect everyone)
शमा सिकंदरने अभिनयाच्या दुनियेत बरीच मजल मारली आहे. त्यातून या ग्लॅमरस दुनियेतील खरी रहस्य तिच्यापर्यंतही पोहचल्याशिवाय राहिली नाहीत. तेव्हा असं असून देखील शमानं एका मुलाखती दरम्यान सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आज बॉलिवूडमध्ये खूप बदल झाले आहेत यापूर्वी निर्मात्यांची त्याच्याशी असलेली वागणूक अजिबात चांगली नव्हती.
कास्टिंग काउचबद्दल शमा म्हणाली की, एक काळ असा होता की अनेक निर्मात्यांना तिच्याशी मैत्री करायची होती ज्यात त्यांचा हेतू हा खूप चुकीचा असायचा. तिनं खुलासा केला की, 'पूर्वी अनेक निर्मात्यांना माझ्याशी मैत्री करायची होती, पण मला वाटायचे की आपण एकत्र काम केले नाही तर मैत्री कशी होणार. मला कळून चुकले की त्याला फक्त कामाच्या बदल्यात सेक्स हवा होता.
पुढे बोलताना शमा म्हणाली की, इंडस्ट्रीमध्ये असे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक आहेत ज्यांनी तिच्यासोबत चुकीचे करण्याचा प्रयत्न केला.
शमा म्हणाली, 'कास्टिंग काउच फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर सगळीकडे होत आहे.' मात्र, आजचे निर्माते खूप बदलले आहेत, असे या अभिनेत्रीचे मत आहे. शमा म्हणते की तरुण निर्माते खूप व्यावसायिक आहेत. ते इतर लोकांनाही खूप आदराने वागवतात. कामाच्या बदल्यात सेक्स करण्याचा विचार ते करत नाही.