आधी खास व्यक्तीसोबत आणि आता थेट भरजरी शालू नेसून दिसली समंथा; नेमकं काय सुरुये?

तिथे चाहत्यांच्या मनातून तिचं नाव उतरत नाही, तोत समंथानं एका खास व्यक्तीसोबतता फोटो शेअर केला. 

Updated: Feb 23, 2022, 05:54 PM IST
आधी खास व्यक्तीसोबत आणि आता थेट भरजरी शालू नेसून दिसली समंथा; नेमकं काय सुरुये?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही तिच्या चित्रपटांमुळे दाक्षिणात्य कला जगतामध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. समंथा फक्त चित्रपटांमुळेच नव्हे, तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही बऱ्याच चर्चांना वाव देऊ लागली आहे. अभिनेता नागा चैतन्य याच्याशी लग्न, त्यानंतर जवळपास चार वर्षांनी नात्यात आलेला दुरावाही या चर्चांना वाव देऊन गेला. (samantha ruth prabhu )

कोणालाही अपेक्षा नसल्यामुळे नात्यात दुरावा येणं यामागचं मुख्य कारण ठरलं. 

इतर काही कलाकारांप्रमाणे समंथा तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाला निवडणार का हा प्रश्नही चाहत्यांनी उपस्थित केला. 

तिथे चाहत्यांच्या मनातून तिचं नाव उतरत नाही, तोत समंथानं एका खास व्यक्तीसोबतता फोटो शेअर केला. 

या व्यक्तीसोबत असणारं नातं ती इथं सर्वांसमोर मांडताना दिसली. ही व्यक्ती म्हणजे समंथाची खास मैत्रीण आणि 'लेडी सुपरस्टार' या नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा. 

टॉलिवूडमध्ये या दोन्ही अभिनेत्रींच्या मैत्रीचे किस्से सर्वज्ञात आहेत. मैत्रीचं हे नातं साजरा करणारी हीच समंथा आता चक्क भरजरी शालू नेसूनच चाहत्यांच्या समोर आली. 

पुढे.... पुढे व्हायचं तेच झालं. ती का, कुठे आणि कधी इतकी सुंदर होऊन गेली होती हाच प्रश्न चाहत्यांना पडला. 

आता शालू वगैरे म्हटलं तर काहींचे विचार अपेक्षित मार्गाने विचार करु लागले. पण, प्रत्यक्षात मात्र यामागचं कारण वेगळं आहे. 

तेलंगाणा येथील नालगोंडा इथं समंथा एका दुकानाच्या उदघाटनासाठी पोहोचली होती. प्रमुख पाहुणी म्हणून तिची इथं उपस्थिती होती. 

समंथा येणार म्हणून इथं चाहत्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. या अभिनेत्रीनंही मोठ्या मनानं चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि लक्ष वेधणारी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली.