लग्नानंतर लगेचच आलियाला मोठा धक्का; कोणी हिसकावला तोंडचा घास ?

तिला येत्या दिवसांमध्ये सावधगिरीनं पावलं टाकावी लागणार आहे.

Updated: May 2, 2022, 11:27 AM IST
लग्नानंतर लगेचच आलियाला मोठा धक्का; कोणी हिसकावला तोंडचा घास ?  title=
alia bhatt

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा विवाहसोहळा पार पडला. मोठ्या दिमाखात आणि अतिशय सुरेख अशा या सोहळ्यामध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया कपूर कुटुंबाची सून झाली.

लग्नाच्या या टप्प्यानंतर लगेचच आलिया आणि रणबीर या दोघांनीही आपआपल्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. ठरलेल्या तारखांना, ठरलेल्या चित्रपटांसाठी ही जोडी वेळ देताना दिसली. (Alia bhatt Ranbir Kapoor wedding )

सगळीकडेच आनंदी आनंद असताना मात्र आता आलियाला एक मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळं तिला येत्या दिवसांमध्ये सावधगिरीनं पावलं टाकावी लागणार आहे.

नाही म्हटलं तरी आलियाच्या भविष्यासाठी हा धोका जास्त घातक असल्याचं कळत आहे. असं म्हटलं जात आहे की आलियानं तिच्या आगामी प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला आहे. अभिनेता ज्युनिअर एनटीआर याच्यासोबत ती स्क्रीन शेअर करणार होती.

पण, असं काही झालं नाही. RRR या चित्रपटामध्ये आलियाच्या भूमिकेवर बरीच कात्री चालवण्यात आली होती. ज्यामुळं तिनं आता ज्युनिअर एनटीआरचाही चित्रपट सोडल्याचं म्हटलं जात आहे.

आलियानं या प्रोजेक्टमधून बाहेर पडताच निर्माते थेट अभिनेत्री रश्मिका मंदानापर्यंत पोहोचले आहेत. आगामी चित्रपटासाठी देशभरात लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीची निवड निर्माते आणि दिग्दर्शक करु इच्छित होते. त्यासाठीच त्यांनी रश्मिकाच्या नावाला पसंती दिली.

रश्मिकाच्या कारकिर्दीसाठी हा एक मोठा चित्रपट ठरू शकतो. ज्यासाठी तिला तगडं मानधनही मिळणार आहे.

rashmika mandanna news | DNA India

महत्त्वाचा मुद्दा असा, की आलियाचा पाय निघताच लगेचच तिला पर्यायही तयारच होता. ज्यामुळं येत्या काळात आलियानं आपल्या कारकिर्दीच्या दृष्टीनं निर्णय घेताना सर्वच परिस्थितीचा विटार करण्याची गरज असणार आहे. अन्यथा या लोकप्रियतेत भागीदार येण्यास वेळ लागणार नाही.