रुग्णालयातून परतलेल्या धर्मेंद्र यांचा चाहत्यांना महत्वाचा मेसेज...सल्ला ऐकून नक्कीच विचार कराल

रुग्णालयातून परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलाताना दिसत आहेत.

Updated: May 2, 2022, 10:55 AM IST
रुग्णालयातून परतलेल्या धर्मेंद्र यांचा चाहत्यांना महत्वाचा मेसेज...सल्ला ऐकून नक्कीच विचार कराल title=

मुंबईः प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना रविवारी संध्याकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. 
आता रुग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपल्या तब्येतीविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

मागच्या चार दिवसांपासून पाठदुखीने त्रस्त असलेल्या धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्यायाम करत असताना धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. रुग्णालयातून परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलाताना दिसत आहेत. ते म्हणाले,

“मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. मी जे केलं त्याचा परिणाम मला सहन करावा लागला आहे. पाठीवरची एक मांसपेशी खेचली गेल्यानं मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागच्या ४ दिवसांमध्ये मला बराच त्रास झाला. पण आता तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वादांमुळे मी ठीक आहे आणि घरी परतलो आहे. काळजी नसावी. यापुढे मी असं काहीच करणार नाही. काळजी घेईन.” धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.