मुंबईः बॉलिवूडची एंटरटेन्मेट क्वीन राखी सावंत नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. राखीच्या आयुष्यात आता एका व्यक्तीचं आगमन झालं आहे. त्यामुळे राखी सावंत भलतीच खूश आहे. एका कार्यक्रमातील राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये राखी आदिलसोबत तिचं प्रेम जगासमोर व्यक्त करताना दिसत आहे.
राखी सावंतला तिचा नवा जोडीदार सापडला आहे आणि राखी तिच्या नवीन जोडीदारासोबत आनंदी दिसत आहे. राखीनेया तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून राखी सावंतने पहिल्यांदाच जगासमोर जाहीर केलं की, ती आता सिंगल नाहीय
राखी सावंत आदिलसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. पापाराझींनी राखीला बिग बॉसच्या आगामी सीझनबद्दल विचारलं यावर राखी म्हणाली- मी बॉयफ्रेंडसोबत जावं असं तुला वाटतं का? राखी आदिलला तिचा बॉयफ्रेंड म्हणते.
राखी सावंत तिच्या नवीन बॉयफ्रेंडचे कौतुक करताना म्हणते - जब उपरवाला देता है तो छप्पर फाडके देता है.
राखी सावंतने आता आदिलसोबत त्यांच्या नात्याची कबुली दिली असली तरी तिच्या चाहत्यांना मात्र यावर विश्वास बसत नाहीय. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून भरपूर कमेंट्स येत आहेत. एका यूझरने म्हटलंय की तुमची जोडी चांगली दिसतेय मात्र फक्त हे तू सांगतेय ते खोटं नसावं. तसंच अनेक यूझर्सने त्यांच्या जोडीचं कौतुक केलं आहे.