मुलीच्या जन्मानंतर Priyanka कडे आणखी एक Good News, चाहते म्हणतात, परत.....

मुळात मुलीच्या जन्माला महिनाही उलटत नाही, तोच आणखी एक गोड बातमी.... असं म्हणताच आता चाहते पेचात पडत आहेत. 

Updated: Feb 3, 2022, 03:27 PM IST
मुलीच्या जन्मानंतर Priyanka कडे आणखी एक Good News, चाहते म्हणतात, परत.....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री  प्रियांका चोपड़ा (Priyanka Chopra)आणि पती निक जोनास यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या नात्यात एका बाळाचं स्वागत केलं. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियांना सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. एकिक़डे तिनं ही आनंदवार्ता दिलेली असतानाच दुसरीकडे तिच्याकडून आणखी एक गोड बातमी मिळाली आहे. 

मुळात मुलीच्या जन्माला महिनाही उलटत नाही, तोच आणखी एक गोड बातमी.... असं म्हणताच आता चाहते पेचात पडत आहेत. 

इतक्या लवकरच पुन्हा गोड बातमी, अशा आशयाचा प्रश्नही काहीजणांच्या मनात घर करत आहे. 

पण, ही ती गोड बातमी नसून प्रियांकाच्या कारकिर्दीशी संबंधित अशी गोड बातमी आहे. 

दिग्दर्शक केविन सुलिवान (Kevin Sullivan)च्या 'एंडिंग थिंग्स'मध्ये एंथनी मॅकी (Anthony Mackie)सोबत तिला साईन करण्यात आलं आहे. 

'क‌ॅप्टन अमेरिका', 'अँट मॅन', 'कॅप्टन अमेरिका: सिविल वॉर', 'अॅवेंजर्स' अशा कैक मार्वल चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. 

सध्याच्या घडीला प्रियांका तिच्या घरात येणाऱ्या तान्हुल्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहे. यासाठी तिनं कामातूनही वेळ काढल्याचं म्हटलं जात आहे. 

असं असलं तरीही काही मोठे प्रोजेक्ट मात्र ती सोडताना दिसत नाहीये. तेव्हा आता काम आणि कुटुंबामध्ये ती समतोल कशी राखते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.