लग्नाच्या तीन महिन्यानंतर परिणीती चोप्राने दिली गुडन्यूज, म्हणाली 'आता मीही...'

लग्नाला तीन महिने उलटल्यानंतर परिणीती चोप्राने चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. तिने स्वत: पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. 

Updated: Jan 25, 2024, 04:49 PM IST
लग्नाच्या तीन महिन्यानंतर परिणीती चोप्राने दिली गुडन्यूज, म्हणाली 'आता मीही...' title=

Parineeti Chopra Career : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा तीन महिन्यांपूर्वी पार पडला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबरला सप्तपदी घेतली. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नाला तीन महिने उलटल्यानंतर परिणीती चोप्राने चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. तिने स्वत: पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. 

परिणीती चोप्राने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती गाताना दिसत आहे. त्याबरोबरच परिणीतीने एक फोटोही पोस्ट केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने एक नवीन घोषणाही केली आहे. 

परिणीती चोप्राची मोठी गुडन्यूज

परिणीती चोप्राच्या या नवीन पोस्टमध्ये तिने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. यात परिणीतीने एक नवा प्रवास सुरु असल्याचे सांगितले आहे. यावेळी ती म्हणाली, "संगीत ही माझ्यासाठी नेहमीच आनंद देणारी जागा राहिली आहे. मी आतापर्यंत अनेक संगीतकारांना वर्षांनुवर्षे स्टेजवर परफॉर्म करताना पाहिले आहे आणि आता मीही या जगाचा एक भाग होणार आहे. मी स्वत:ला खूप  नशीबवान समजते की माझ्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरु होत आहे. मी प्रामाणिकपणे सांगते की मी माझा संगीतातील नवा प्रवास सुरु करण्यासाठी फारच उत्सुक आहे."

"मला एकाचवेळी दोन क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळत आहे. हे किती मजेशीर आहे. अखेर मी माझ्या सर्व भीतींवर मात करत गायनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मला आशा आहे की तुम्ही माझ्याइतकेच उत्साहित असाल", असे परिणीती चोप्राने म्हटले आहे. परिणीती चोप्राच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर सोहा अली खानने माशा अल्लाह... खूपच छान अशी कमेंट केली आहे. तर काहींनी तिला तिच्या नव्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @parineetichopra

दरम्यान परिणीती चोप्रा ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच चांगली गायिकादेखील आहे. परिणीतीने काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला तिने तिच्या आवाजात गायलेले गाणे रेकॉर्ड केले होते. तिने तिच्या लग्नासाठी हे खास गाणे गायले होते. परिणीती चोप्रा ही 'मिशन रानीगंज' या चित्रपटात झळकली होती. यात तिने अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपटात ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता.