शाहरुख खानमुळे नयनताराने घेतली बॉलिवूडमधून एक्झिट? कारण जाणून बसेल तुम्हालाही धक्का

नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला 'लेडी सुपरस्टार' म्हणूनही ओळखलं जातं. असंही म्हटलं जातं की, रजनीकांतची जशी क्रेझ आहे तशीच क्रेझ नयनतारासाठीही आहे. 

Updated: Nov 10, 2023, 06:34 PM IST
शाहरुख खानमुळे नयनताराने घेतली बॉलिवूडमधून एक्झिट? कारण जाणून बसेल तुम्हालाही धक्का title=

मुंबई : नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला 'लेडी सुपरस्टार' म्हणूनही ओळखलं जातं. असंही म्हटलं जातं की, रजनीकांतची जशी क्रेझ आहे तशीच क्रेझ नयनतारासाठीही आहे. नयनताराने अॅटलीच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने शाहरुख खानच्या पत्नी नर्मदाची भूमिका साकारली होती. मात्र, आता बातमी समोर येत आहे की, 'जवान'च्या यशाचं श्रेय न मिळाल्याने अभिनेत्री संतापली आहे. ती फक्त साऊथ इंडस्ट्रीतच काम करणार असून आता कुठलाही हिंदी चित्रपट करणार नसल्याचंही बोललं जात आहे.

'टाईम्स नाऊ'च्या रिपोर्टनुसार, 'जवान' हा चित्रपट शाहरुख खान आणि नयनताराचा चित्रपट असणार होता, पण याचं सर्वाधिक श्रेय शाहरुख-दीपिकाला दिले जात आहे. यामुळे नयनताराचे चाहते किंवा नयनतारा स्वतः याबाबत खुश नाहीये. नयनताराला ऑफर करण्यात आलेली भूमिका लहान करण्यात आल्याचं चाहत्यांचं म्हणणे आहे. दीपिकाचा 'जवान' चित्रपटात कॅमिओ होता.

संजय लीला भन्साळी यांच्याशी चर्चा सुरू होती
रिपोर्ट्सनुसार, नयनताराने आता ठरवलं आहे की, ती फक्त साऊथ इंडस्ट्रीत काम करणार आहे. आता ती बॉलिवूडचा कोणताही चित्रपट करणार नाही. अशी माहिती आहे की, नयनतारा संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाली होती, त्यानंतर ती भन्साळींच्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. 'बैजू बावरा' संदर्भात दोघांमध्ये चर्चा सुरू होती.

नयनतारा आगामी 'इरायवन' या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमासाठी नयनताराने 10 कोटी रुपये फी घेतल्याचंही बोललं जात आहे. 'जवान'साठीही तिने तेवढीच रक्कम घेतली होती.