मृण्मयी देशपांडेची प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हाणामारी; व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा सोशल मीडियावर मृण्मयीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. नेहमीच मृण्मयी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी मृण्मयी यावेळी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Updated: Feb 1, 2024, 04:30 PM IST
मृण्मयी देशपांडेची प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हाणामारी; व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ title=

मुंबई : प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर मृण्मयीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मृण्मयीने एखादी जरी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. मृण्मयी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. नेहमी मृण्मयी कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असते. तिच्या पर्सनल आयुष्यात काय चालू हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना कायमच आवडतं. आता मृण्मयाी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मृण्मयीचा हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

समोर आलेल्या व्हिडीओत नुकतीच गौतमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट गौतमीने मृण्मयीला टॅग केली आहे. जी पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्रीला झोपेतून उठवताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती तिला मारतानाही दिसत आहे आणि ही अभिनेत्री दूसरी तिसरी कोणी नसून मृण्मयीची सख्खी बहिण गौतमी देशपांडे आहे. नुकताच गौतमीचा वाढदिवस पार पडला. या निमीत्ताने मृण्मयीने तिला फार गंमतिशीर पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौतमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. मृण्मया आणि गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या दोन्ही बहिणीची केमिस्ट्री तिच्या चाहत्यांनाही चांगलीच पसंतीस उतरत असते. शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, उरावर बसणे च थोडक्यात picturization. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, आता गौतमी जो त्रास द्यायचा तो नवऱ्याला देईल म्हणून मृणमयी ने तीच लग्न लावून दिल पण काही उपयोग नाही. तर अजून एकाने लिहीलंय की, लग्न झालं तरी अजून लहानच वाटता तुम्ही लय भारी अप्रतिम बहिणी  असेच रहा सदैव. तर अनेकांनी गौतमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.